IPL 2019: कोलकाता नाईट रायडर्सविरोधात किंग्ज इलेव्हन पंजाबला कुठली चूक महागात पडली?

आंद्रे रसेल Image copyright AFP
प्रतिमा मथळा आंद्रे रसेल

बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सनं पंजाब इलेव्हनचा 28 धावांनी पराभव केला. फक्त एका चुकीमुळे उत्तम कामगिरी केलेल्या पंजाबला हार पत्करावी लागली.

पंजाबसमोर 219 धावांचं लक्ष्य होतं. पण त्यांना 20 ओव्हर्समध्ये त्यांना केवळ 190 धावांचा पल्ला गाठता आला. के.एल.राहुल केवळ एक रन बनवून आऊट झाला. हा त्यांच्यासाठी मोठा झटका होता.

गेल्याच मॅचमध्ये दमदार कामगिरी करणारा ख्रिस गेल देखील फक्त 20 धावा करू शकला. त्यानंतर आलेल्या सरफराजलाही रसेल या गोलंदाजाने तंबूत पाठवलं. मयंक अग्रवालनं 58 तर डेव्हिड मिलरने काढलेल्या 59 रनांमुळे पंजाबचा डाव सावरला.

टॉस हारल्यानंतर कोलकाताला बॅटिंग देण्यात आली. त्याचा पुरेपूर फायदा कोलकाताने उचलला. नीतीश राणाने 63, रॉबिन उत्थप्पाने 67 आणि आंद्रे रसेलने काढलेल्या 48 रनांमुळे कोलकात्याची धावसंख्या 218 झाली.

पंजाबच्या गोलंदाजांना कोलकाता नाइट रायडर्सनं चांगलंच झोडपलं. नाइट रायडर्सनं 17 सिक्सर मारले.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आंद्रे रसेल

कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकनं नीतिश राणाला ओपनिंग ऐवजी मिडल ऑर्डरला पाठवलं. कार्तिकचा हा निर्णय योग्य ठरला. नीतिश राणाने 63 धावा कुटल्या. त्याव्यतिरिक्त रॉबिन उत्थप्पाने 50 बॉल्समध्ये 67 धावा केया. तर आंद्रे रसेलने 17 चेंडू खेळले त्यापैकी त्याने 8 वेळा चेंडू सीमेपलीकडे पाठवला. त्यानं 17 चेंडूत 48 धावा केल्या.

रॉबिन उत्थप्पा आणि रसेलनं 67 धावांची पार्टनरशिप केली.

Image copyright Pti

मोहम्मद शामीनं आंद्रे रसेलला क्लीन बोल्ड केलं पण पंचांनी तो नो-बॉल दिला. हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हा रसेल फक्त तीन धावांवर खेळत होता. मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करत त्यानं 48 केल्या.

कोलकाता नाइट रायडर्सचा हा सलग दुसरा विजय आहे. आज (गुरुवारी) रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)