Mission Shakti : भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट उद्ध्वस्त केलं #बीबीसी मराठी राउंड अप

Image copyright Getty Images

1. Mission Shakti : भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट उदध्वस्त केलं

अमेरिका,चीन आणि रशियानंतर भारतही अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे. भारतानं 'मिशन शक्ती'च्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट नष्ट केलं आहे. ही एक नियोजित मोहीम होती. हे मिशन केवळ तीन मिनिटात पार पाडल्याचंही मोदींनी देशाला सांगितलं.

तब्बल अर्धा-पाऊण तास देशाची उत्कंठा शिगेला पोहोचवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत देशाला संबोधित करताना महत्त्वाची माहिती दिली. मोदी काय म्हणाले आणि अॅंटी सॅटेलाइट वेपन्स म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी.

2. Mission Shakti : लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय, भारत खरंच अंतराळ महाशक्ती बनला आहे?

भारतानं 'मिशन शक्ती'च्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट नष्ट केलं आहे. ही एक नियोजित मोहीम होती.

Image copyright drdo

हे मिशन केवळ तीन मिनिटात पार पाडल्याचंही मोदींनी देशाला सांगितलं. पण लोअर अर्थ ऑरबिट म्हणजे नेमकं काय? भारत खरंच अंतराळ महाशक्ती बनला आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

3. लोकसभा 2019 : नितीन गडकरी म्हणतात, लष्कराची कामगिरी हा राजकारणाचा वा श्रेयाचा विषय बनता कामा नये

लष्कराच्या कामगिरीचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये, तसं केलं तर ते चूकच आहे या मताचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

Image copyright Sharad badhe

"हा राजकारणाचा विषय नाही. देशाची सुरक्षा ही इतर सर्व गोष्टींच्या वर आहे. त्यामुळे हा राजकारणाचा वा श्रेयाचा विषय बनता कामा नये. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्वांनी सृजनशील आणि संवेदनशील राहणं हेच जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही बाजूनं राजकारणात अशा गोष्टी येणं हे देशाच्या हिताचं नाही आहे," असं गडकरी म्हणाले आहेत.

ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

4. लोकसभा 2019: प्रकाश जावडेकर बीबीसीच्या मुलाखतीदरम्यान का संतापले?

राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष टिकणारच नाही. लोकांना आता फक्त भाजपमध्ये आशा दिसत आहे, म्हणून भाजपमध्ये इतके नेते प्रवेश करत आहेत, असं केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

Image copyright Sharad badhe

बीबीसी मराठीचे मयुरेश कोण्णूर यांच्याशी बोलताना जावडेकर यांनी भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांचं राजकारण, 'मैं भी चौकीदार' मोहीम आणि नेत्यांच्या पक्षांतराबद्दल बोलले. मात्र पुलवामा हल्ला आणि स्ट्राइक्सवरील काही प्रश्नांची उत्तरं देताना ते आपला संताप लपवू शकले नाहीत.

ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

5. मत्स्यकन्यांवर 'सेन्सॉर'चा बडगा, शरीर झाकल्याने नवा वाद

मत्स्यकन्या असोत वा पऱ्या यांना लहान मुलांच्या भावविश्वात एक वेगळं स्थान असतं. लहान मुलांच्या गोष्टींचे विषय बहुतेक वेळा याच पात्रांच्या भोवती फिरतात. पण याच मत्स्यकन्यांमुळे इंडोनेशियात वाद उफाळला आहे.

Image copyright AFP

तब्बल 15 वर्षांपासून थीम पार्कमध्ये असणाऱ्या मत्स्यकन्यांच्या पुतळ्याला कापडाने गुंडाळल्यामुळे या कथित सेन्सॉरशिपवरून इंडोनेशियात नवा वाद निर्माण झाला आहे.

ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)