पुण्यातून एका जहालवादी संशयिताला अटक, ATSची कारवाई

ु Image copyright Getty Images

एटीएसनं कारवाई करत पुण्यातून एकाला संशयिताला अटक केली आहे. शरियत मंडल असं त्याचं नाव आहे. तो 19 वर्षांचा आहे.

बांगलादेशातल्या ISBD या जहालवादी संघटनेत लोकांची भरती करण्यासाठी प्रयत्न केल्याचा शरियतवर आरोप आहे. बिहार आणि महाराष्ट्र एटीएसनं पुण्यातल्या चाकणमध्ये ही कारवाई केली आहे.

यापूर्वी बिहारच्या दहशतवादविरोधी पथकानं दोन बांगलादेशी तरुणांना अटक केली होती. हे दोघं ISBDया जहालवादी संघटनेसाठी तरुणांची भरती करत होते.

शरियत हा यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अबू सुल्तान आणि खैरुल मंडल यांच्या सतत संपर्कात होता, असं पोलिसांचं म्हणण आहे.

शरियतला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर बिहार एटीएसच्या ताबयात देण्यात आलं आहे.

या घटनेची चौकशी बिहारचं दहशतविरोधी पथक करत असल्यानं पुढील चौकशी बिहारमध्येच होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)