मिशन शक्ती, राजू शेट्टी, मोहसीन अख्तर मीर, #BBCRiverStories: बीबीसी मराठी राउंड अप

Image copyright Getty Images

भारताकडे मिशन शक्ती, तर पाकिस्तानकडे काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घोषणा केली की भारत हा अंतराळ महाशक्ती बनला आहे. अॅंटी सॅटेलाइट मिसाइल क्लबमध्ये भारताचा समावेश झाला असल्याचं घोषित केलं.

भारताने उचललेल्या पावलाचे पडसाद पाकिस्तानमध्ये देखील पडले आहेत. जर पाकिस्तानला भारताशी अवकाश तंत्रज्ञानात स्पर्धा करायची असेल तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?

वाचा पाकिस्तानचे पत्रकार हारून रशीद यांनी घेतलेला आढावा.

राजू शेट्टी - कट्टर पवार विरोधक ते आता समर्थक

साखर कारखानदार असोत वा प्रस्थापित नेते, या सर्वांना विरोध करत राजकारणाची सुरुवात करणारे राजू शेट्टी यांचं यंदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळ पूर्ण झालं आहे.

हातकणंगले मतदारसंघात ते पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपा-सेना महायुतीचा त्यांना पाठिंबा होता. यंदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरले आहेत.

हे हृदयपरिवर्तन कसं झालं?

नेत्यांची ट्विटरवर तिखट मैफल

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा राज ठाकरे, आशिष शेलार आणि धनंजय मुंडे

कवितेच्या माध्यमातून विरोधकावंर टीका करण्यासाठी रामदास आठवले यांना ओळखलं जातं. पण आज भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर कवितेच्या माध्यमातून आगपाखड केली आहे.

भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात रंगलेली ही तिखट ट्विटर मैफल आणि त्याबद्दल खऱ्या कवींना काय वाटतं. पाहू या या लेखात

उर्मिला मातोंडकर यांना नवऱ्यावरून एवढं का ट्रोल केलं जातंय?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 3 मार्च 2016ला मोहसीन अख्तर मीर यांच्याशी लग्न केलं. मोहसीन काश्मीरचे असून ते व्यावसायिक आणि मॉडेल आहेत. ते उर्मिला यांच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहेत.

लग्नानंतर उर्मिला यांनी DNAला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं, "आम्ही आमच्या लग्नात फक्त कुटुंबीय आणि मित्रांना बोलावलं होतं. कारण लग्न साध्या पद्धतीनं व्हावं अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे ते अत्यंत खासगी पद्धतीनं झालं."

या दोघांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं झालं होतं. त्यांच्या लग्नाला प्रसिद्ध व्यक्तींपैकी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होते.

पण त्यांना यावरून एवढं ट्रोल का केलं जातंय?

काय आहे महाराष्ट्राच्या मनात? #BBCRiverStories

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या लोकांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, हे #BBCRiverStories या सीरिजमधून बीबीसी मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

यूट्यूबर निकिता गिरीधर नार्वेकर यांच्यासोबत बीबीसी मराठीची टीम नाशिकली पोहोचली आणि गोदावरी नदीच्या तिरावर नाशिकरांना त्यांच्या प्रश्नांबदद्ल विचारलं.

गुरुवारचं बीबीसी विश्व बुलेटिन पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)