सेन्सेक्स @39,000.. परदेशी गुंतवणूकदारांमुळे बाजारात उसळी

व्यापार Image copyright PTI
प्रतिमा मथळा सेन्सेक्स

सोमवारी सेन्सेक्सने जबरदस्त उसळी घेत 39,000 हजाराचा टप्पा गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दोनशे अंकांच्या तेजीने 38,869 वर उघडला. 10.21 मिनिटांनी सेसेन्क्सने 335 अंकांच्या वृद्धीसह 39,000 हजाराचा टप्पा ओलांडला.

आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरांत कपात केली होती. यामुळे गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

विक्रमी खरेदी

परदेशातील पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) विक्रमी खरेदी केली आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून आतापर्यंत एफपीआयने 34 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खरेदी केली आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एखाद्या महिन्यात झालेली ही विक्रमी खरेदी आहे.

याधी मार्च 2017मध्ये एफपीआय खरेदी 30906 कोटी रुपयांवर गेली होती.

एफपीआयमध्ये झालेली ही वाढ चकीत करणारी आहे असं दिल्लीमधील एका सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्ममधील रिसर्च हेड आसिफ इकबाल सांगतात.

एफ़पीआय शिवाय परदेशी गुंतवणूकदारांनी डेट मार्केटमध्येही भरपूर पैसे ओतले आहेत. मार्च महिन्यात 13 हजार कोटी रुपये डेट मार्केटमध्ये आले. याचाच अर्थ मार्च महिन्यात 43 हजार कोटी रूपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे.

अमेरिकेत मंदीची शक्यता

अमेरिकेच्या बॉन्ड बाजारामध्ये उलटा यील्ड कर्व दिसला आहे. जेव्हा दीर्घकालीन डेट इन्स्ट्रुमेंट यील्ड अल्पकालीन डेट इन्स्ट्रुमेंट यील्डपेक्षा कमी होते तेव्हा अशा प्रकारची स्थिती दिसून येते. प्रत्येक मंदीच्या आधी अमेरिकेमध्ये असा यील्ड कर्व दिसून आला आहे आणि त्याला मंदीचा संकेत मानले जाते.

अर्थात अमेरिकेत मंदी येईलच असे नाही. अर्थतज्ज्ञ सुनील सिन्हा सांगतात, "आताच मंदीची घोषणा करणे घाईचे ठरेल. अमेरिकेच्या विकसदराचे या महिन्याचे आकडे येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे. तसेच या परिस्थितीला डोनल्ड ट्रंप सरकार कसे हाताळते हा पाहणे आवश्यक आहे."

जेव्हा कच्च्या तेलावर नियंत्रण असते आणि परदेशी गुंतवणूकदार डॉलरचा ओघ तुमच्या देशात आणतात तेव्हा रुपयाची किंमत वधारणारच. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत सुधारली आहे. आता एका डॉलरची किंमत साधारणपणे 69 रूपये इतकी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉलरमागे साडे 74 रुपये मोजावे लागत होते.

स्वस्त कर्ज मिळण्याची अपेक्षा

याशिवाय भारतीय शेअर बाजाराला आणखी एका आकांक्षेचे पंख मिळाले आहेत. ते म्हणजे स्वस्त दरातील कर्जाचे. दोन एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची बैठक होईल. तीन दिवसांच्या बैठकीनंतर रेपो रेट (रेपो रेट म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना कर्ज देते) घटण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी महिन्यात व्याज दरांमध्ये पाव टक्क्यांनी घट केली होती. आता हा दर 6.25 टक्के इतका आहे. 18 महिन्यांनंतर भंकेने आपल्या ग्राहकांसाठी कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या