लोकसभा निकाल: बीबीसीच्या नावाने पसरवला जात असलेला 'तो' सर्व्हे खोटा

बीबीसी

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीच्या नावाने एक सर्व्हे सध्या व्हॉट्सअॅपवर सर्वत्र फॉरवर्ड केला जात आहे. एका स्थानिक वृत्तपत्रानेही बीबीसीच्या नावाने एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. हा सर्व्हे खोटा असून आम्ही भारतात निवडणुकीआधी कोणतेही सर्व्हे करत नाही, असं बीबीसी न्यूजने प्रसिद्धिपत्रात म्हटलं आहे.

बीबीसीच्या प्रेस कार्यालयाने म्हटलं आहे:

'लोकसभा निवडणुकांविषयीचा एक खोटा सर्व्हे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर पसरताना दिसत आहे आणि हा सर्व्हे बीबीसी न्यूजने केल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा सर्व्हे खोटा आहे आणि बीबीसीने केलेला नाही. बीबीसी भारतात निवडणूकपूर्व सर्व्हे करत नाही.'

"बीबीसी लंडनचं विश्लेषण" अशा मथळ्याने पसरवल्या जात असलेल्या या मेसेजमध्ये प्रत्येक राज्यात कोणकोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची सविस्तर आकडेवारी देण्यात आली आहे.

खोटी बातमी
फोटो कॅप्शन,

खोटी बातमी

असे मेसेज बीबीसीच्या नावे अनेकदा पसरवले जातात, विशेषतः निवडणुकांच्या काळात.

काही महिन्यांपूर्वी मतदानाच्या पूर्वीच्या काळात आलेल्या दुसऱ्या एका मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की लोकसभा निवडणुकीत भाजपचा बहुमताने विजय होईल. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत, असा दावाही बीबीसीच्या नावाने करण्यात आला आहे.

खोटा सर्व्हे
फोटो कॅप्शन,

खोटा सर्व्हे

हा सर्व्हे खरा वाटावा म्हणून खाली बीबीसीच्या इंग्रजी वेबसाईटची लिंकही दिली आहे. लिंक दिल्यामुळे बीबीसीचा लोगो दिसतो आणि हा मेसेज खरा असल्याचा भास निर्माण होतो.

फेक न्यूज
फोटो कॅप्शन,

फेक न्यूज

फेक न्यूजचा मुकाबला

फेक न्यूज म्हणजे खोट्या बातम्या या मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीने नोव्हेंबर 2018 मध्ये पुण्यात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याविषयी तुम्ही इथे वाचू शकता:

बीबीसी न्यूज मराठीवर आम्ही दररोज खोट्या बातम्याचा पर्दाफाश करत असतो. त्या बातम्या तुम्ही इथे पाहू शकता - बीबीसी मराठी फॅक्ट चेक.

कर्नाटकातही तेच!

यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळीही असे खोटे मेसेजेस पसरवण्यात आले होते. या सर्व्हेमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (प्रत्यक्षात निवडणुकांनंतर तिथे काँग्रेस-सेक्युलर जनता दलाचं सरकार आलं.) 10 लाखांहून अधिक लोकांशी बोलून हा सर्व्हे करण्यात आला, असाही दावा करण्यात आला होता. त्याही वेळी बीबीसीनं स्पष्टीकरण देऊन हा सर्व्हे खोटा असल्याचं म्हटलं होतं.

Fake survey
फोटो कॅप्शन,

फेक सर्व्हे

बीबीसीने लोकसभा निवडणुकांचं केलेलं वार्तांकन पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही नक्की वाचा

आणि पाहा निकालाच्या दिवशी बीबीसी मराठीचं लाईव्ह कव्हरेज इथे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)