तालिबाननं उद्ध्वस्त केलेला बुद्धाचा ‘तो’ पुतळा नव्यानं उभा राहणार-व्हीडिओ

1996 मध्ये जेव्हा तालिबाननं अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केली तेव्हा देशभर इस्लामच्या नावाखाली अनेक कट्टरपंथी कायदे लागू केले.

याचाच भाग म्हणून अफगाणिस्तानच्या समृद्ध इतिहासाचा भाग असलेल्या बऱ्याचशा गोष्टी तालिबानी राजवटीमध्ये नष्ट करण्य़ात आल्या. जगातील बुद्धाचा सर्वांत उंच पुतळाही तालिबानी राजवटीनं जमीनदोस्त केला.

आता हा पुतळा पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काबुलमधील नॅशनल म्युझिअममधील पुरातत्त्व शास्त्रज्ञ छिन्न-विछिन्न तुकड्यांमधून आता बुद्धाचा हा पुतळा उभारणार आहे...

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)