पुण्यातले सुदानचे विद्यार्थी म्हणतात, 'युद्धात फार गमावलं, आता शांतता हवी'

पुण्यातले सुदानचे विद्यार्थी म्हणतात, 'युद्धात फार गमावलं, आता शांतता हवी'

"युद्धामुळं खूप काही गमावलंय, आम्हाला शांतता पाहिजे. आम्हाला लोकशाही पाहिजे. सगळ्यांना समान संधी मिळावी," असं पुण्यातील मोगताब फैजल सांगतो. मोगताब सुदानचा आहे आणि तो शिक्षणासाठी पुण्यात आला आहे.

सध्या सुदानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. 30 वर्षं सत्तेत असलेले ओमर अल बशीर यांना लष्काराने पदच्युत केलं आहे. अन्न आणि इंधनाचे दर प्रचंड वाढल्याने डिसेंबर 2018पासून सुदानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांचा हा परिपाक होता. भारत-सुदानचे चांगले संबंध असल्याने तिथले अनेक विद्यार्थी भारतात शिकायला येतात. त्यांच्यापैकीच एक मोगताबा फैजल आहे. सुदानची राजधानी खार्टूमजवळ मोगताबाचं घर आहे.

"राष्ट्राध्यक्ष ओमर अल बशीर यांना काढल्यामुळं मी खूप आनंदी आहे. गेली 30 वर्षं म्हणजे माझ्या जन्मापासून तेच राष्ट्राध्यक्ष होते," असं त्यांनं बीबीसीला सांगितलं.

भारताप्रमाणे सुदानमध्येही लोकशाही असावी, असं मोगताबाला वाटतं.

व्हीडिओ शूट आणि एडिट - हलिमा कुरेशी, नितीन नगरधने आणि गणेश पोळ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)