श्रीलंका हल्ल्याशी संबंधित व्हायरल फोटोंमागचं सत्य - बीबीसी फॅक्ट चेक

सोशल मीडिया Image copyright SM Viral Posts

श्रीलंका हल्ल्याशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअपवर हे फोटो हजारो वेळा शेयर केले जात आहेत.

श्रीलंकेतील रविवारी झालेल्या हल्ल्यात 350 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, तर 500हून अधिक जण जखमी झाले आहेत.

असं असलं तरी, व्हायरल फोटे हे जुने आहेत आणि त्यांच्या हल्ल्याशी काहीएक संबंध नाही.

व्हायरल फोटो

श्रीलंकेतील ईस्टर बॉम्ब ब्लास्टमध्ये हे मृत्यू झाले आहेत, असा दावा या फोटोंच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

"श्रीलंकेतील 8 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांविषयी सांत्वना," असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे.

Image copyright SM Viral Post

हे फोटो श्रीलंकेतील आहेत पण त्यांचा नुकताच झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही.

गेट्टी इमेजेस वरून लक्षात येतं की, हे फोटो 16 जून 2006मध्ये श्रीलंकेत केबिटॉगॉल्लेवामध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यातील आहेत.

Image copyright Getty Images

माध्यमांनुसार, केबिटॉगॉल्लेवाच्या हल्ल्यात 61 जणांचा मृत्यू झाला होता. 15 जून 2016ला श्रीलंकेत एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 64 जणांनी जीव गमावला होता. यात 15 लहान मुलांचा समावेश होता.

तरुण बळी

दुसरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याचं कॅप्शन आहे..."श्रीलंकेत ईस्टर संडे हल्ल्यातील सर्वांत तरुण बळी." या फोटोत लहान मुलाच्या शेजारी एक माणूस रडताना दिसत आहे.

'Australian Coptic Heritage and Community Services'' असं म्हणत हा फोटो फेसबुकवर 3 हजार वेळा शेयर करण्यात आला आहे.

Image copyright Getty Images

'' Abbey Roads'' या नावाच्या ब्लॉग पोस्टवर एक फोटो 22 एप्रिल 2019ला 'Infant Martyr of Colombo या कॅप्शनसहित शेयर केला जात आहे.

बीबीसीच्या पडताळणीत लक्षात आलं की, हा व्हायरल फोटोचा श्रीलंकेत रविवारी झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही.

गुगल रिव्हर्स इमेज सर्चनुसार, हेच फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शेयर करण्यात आले होते. जवळपास वर्षभरापूर्वी 12 मे 2018ला.

Patta Wadan फेसबुक युझरनं हा फोटो शेयर केला होता. त्यांच्या फोटोचं कॅप्शन होतं, "हे दु:ख कसं काय सहन केलं जाऊ शकतं? जगातल्या कोणत्याच वडिलांच्या वाट्यासा हे दु:ख येऊ नये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)