प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करा असं संघाचं भाजपला पत्र?

Image copyright Social media
प्रतिमा मथळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लिहिलेलं कथित पत्र

भोपाळच्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करावी अशा आशयाचं पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याचा कथित व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या कथित पत्रावर संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी यांची स्वाक्षरी आहे. मात्र आमच्या पडताळणीत हे पत्र खरं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रातील मालेगाव या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी प्रज्ञा यांच्यावर आरोप असून, त्यासंदर्भात खटला सुरू आहे. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 37 जणांनी जीव गमावला होता तर 125 जण जखमी झाले होते.

प्रज्ञासिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत.

या कथित पत्राचा संबंध वेगळा आहे.

भोपाळमध्ये प्रज्ञा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा मिळणं बंद झालं आहे. त्यामुळे भोपाळचा उमेदवार बदलणं योग्य ठरेल.

आमच्या व्हॉट्सअपवरील वाचकांनीही विश्वासार्हता तपासण्यासाठी त्या पत्राचे फोटो आम्हाला पाठवले. पडताळणी केल्यानंतर हे पत्र फेक असल्याचं स्पष्ट झालं.

सोशल मीडियावर असं पत्र व्हायरल होत असल्याचं माझ्या कानी आलं आहे. मात्र मी अशा स्वरुपाचं कोणतंही पत्र लिहिलेलं नाही. हे खोटं आहे.

पत्रात काय आहे?

यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या महिला उमेदवार किती? यासंदर्भात हे पत्र लिहिण्यात आलं आहे.

पत्राचा विषय असा लिहिण्यात आलाय की, लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवार.

Image copyright An
प्रतिमा मथळा प्रज्ञासिंह ठाकूर या भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार आहेत.

भाजपने 45 महिला उमेदवारांना संधी दिली आहे. काँग्रेसने 47 उमेदवारांना संधी दिली आहे. काँग्रेसच्या जाळ्यात आपण फसू शकतो असा इशारा सोनी यांनी या कथित पत्रात दिला आहे.

8 ते 10 मार्च 2019 रोजी ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रातिनिधिक परिषदेत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हे पत्र लिहिण्यात आलं आहे.

कथित पत्राचा शेवटचा परिच्छेद असा आहे- हिंदू राष्ट्रात मुलांना वाढवणं ही आईची जबाबदारी आहे. आईने ही मुख्य जबाबदारी सोडून दिली, त्या राजकारणाकडे आकर्षित झाल्या तर संस्कृतीचं जतन आणि परंपरा यांच्याकडे कोण बघणार?

जुनं खोटं पत्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने सोशल मीडियात फेक पत्र पसरवलं जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने अशाच स्वरुपाचं आणखी एक खोटं पत्र व्हायरल केलं जात आहे.

या पत्रात संघाचे सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर लखनौ, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात आयकर विभागाने टाकलेल्या धाडीसंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

आयकर विभागाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कर आणि माजी सल्लागार आर.के. मिगलानी यांच्या घरावर 7 एप्रिल रोजी धाड टाकली होती.

आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते भोपाळ, इंदूर, गोवा आणि दिल्ली एनसीआर भागात मिळून 52 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

14.6 कोटी रुपयांची रोकड या धाडीतून जप्त करण्यात आली. 281 कोटी रुपयांच्या अवैध व्यवहारांचे पुरावे सापडल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

फेक पत्रानुसार, संघाने असा दावा केला की संघाचे तसेच भाजपचे या धाडींशी संबंध आहेत. यामुळे संघाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो असं या पत्रात म्हटलं आहे.

भय्याजी जोशी यांच्या नावाने व्हायरल करण्यात येत असलेलं पत्र दिशाभूल करण्यासाठीच व्हायरल करण्यात आलं आहे असं संघाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

निवडणुकीत अनाठायी फायदा मिळवण्यासाठी समाजकंटकांकडून सोशल मीडियावर फेक पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो असं संघाने पत्रकात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)