लोकसभा निवडणूक: मुंबईजवळचे वारली आदिवासी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मराठीत पहिल्यांदाच वारली आदिवासींची गोष्ट व्हर्च्युअल रिअॅलिटीमधून

बीबीसी मराठीच्या वारली आदिवासींच्या व्हर्च्युअल रिअॅलिटी फिल्मला मानाचा डिजिपब वर्ल्ड अवॉर्ड मिळाला आहे.

'बेस्ट इनोव्हेशन इन पब्लिशिंग,' या कॅटेगरी मध्ये हा अवॉर्ड मिळाला आहे.

वाढत्या शहरीकरणाने आदिवासी समाजाच्या संस्कृती आणि अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वर्षानुवर्ष त्यांच्या हक्काची असलेली जमीन आणि जंगल नष्ट होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वास्तव्य असलेल्या वारली समाजासमोरही नेमकी हीच अडचण आहे.

त्यामुळे बीबीसीकडे त्यांनी त्यांच्या समस्या, अडचणी मांडल्या. त्यासुद्धा वारली कलेच्या माध्यमातून. ज्यासाठी हा समाज शेकडो वर्ष ओळखला जातो.

पण यावेळी त्यांची गोष्ट व्हर्च्यअल रिअॅलिटीच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली जात आहे. वारली कलाकार राजेश वनगड यांनी VR हेडसेट वापरून 3D पेंटिंगच्या माध्यमातून त्यांची गोष्ट साकारली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)