रेश्मा पठाण: हिंदी सिनेमातल्या पहिल्या 'स्टंट वुमन'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रेश्मा पठाण : हिंदी सिनेमातल्या पहिल्या 'स्टंट वुमन'

शोले सिनेमातली 'बसंती' सगळ्यांना आठवत असेल पण त्याच सिनेमात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 'बॉडी डबल' करणाऱ्या रेश्मा पठाण अगदी कमी लोकांना माहिती आहेत.

रेश्मा यांना हिंदी सिनेमातली पहिली 'स्टंट वुमन' म्हटलं जातं. त्यांना हिंदी सिनेमातले अॅक्शन डायरेक्टर एस. अझीम यांनी पहिली संधी दिली होती.

त्यांनी अनेक अभिनेत्रींसाठी 'बॉडी डबल' केलं आहे. तसंच अवघड शॉटही दिले आहेत. रेश्मा एका सामान्य कुटुंबातून येतात.

त्या लहानपणी खूप मस्ती करायच्या. त्या स्वत:ला 'टॉम बॉय' समजायच्या. रेश्मा 14 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी 'एक खिलाडी बावन पत्ते' या सिनेमात पहिला स्टंट केला होता.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)