नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या भोजनाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती

उद्धव ठाकरे Image copyright ANI

लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी प्रितिभोजनाचं आयोजन केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रितिभोजनासाठी हजर आहेत. जेडीयूचे नेते नितिशकुमार सुद्धा या कार्यक्रमाला हजर आहेत.

नवी दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये हे भोजन आयोजित करण्यात आलं आहे.

सत्ता स्थापनेसंदर्भातल्या सर्व शक्यता आणि तारखांची यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

या प्रितिभोजनाच्या कार्यक्रमाला भाजपचे सर्व मोठे नेते आणि मंत्री उपस्थित आहेत.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात त्यांच्या मंत्रिमडळातील सर्व सदस्यांची बैठक घेतली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)