माढा लोकसभा निकाल : रणजितसिंह नाईक निंबाळकर की संजय शिंदे कोण जिंकणार?

माढा, शरद पवार Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शरद पवार

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता काही वेळातच स्पष्ट होतील. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा मुसंडी मारता येईल, हेही स्पष्ट होईल.

सध्या तरी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकत. पण हे अंदाज कितपत अचूक ठरतील, हे मतमोजणी पूर्ण झाल्यावरच कळेल.

पाहा निवडणूक निकालांचे ताजे आकडे आणि सविस्तर विश्लेषण इथे -

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
लोकसभा निवडणुकीचे निकाल: ताजे आकडे आणि विश्लेषण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी निवडणूक लढवण्याचं जाहीर करत नंतर माघार घेतल्याने माढा मतदारसंघ चर्चेत आहे. याठिकाणी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे रिंगणात उतरले.

शरद पवारांचा मतदारसंघ असणाऱ्या माढ्यातील लढाई राष्ट्रवादी आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे.

माढ्यात करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला हे सोलापुरातील चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण हे विधानसभा मतदारसंघ येतात.

या मतदारसंघात दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. कांदा, गहू, ज्वारी आणि इतर शेतमालाला भाव मिळत नसून त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो.

सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

"माढा मतदारसंघात आधीपासूनच गटबाजी होती. बबनदादा शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये अंतर्गत वाद होते. एकाला तिकीट दिलं असतं, तर दुसऱ्या गटाकडून बंड होण्याची शक्यता होती. हा वाद टाळण्यासाठी शरद पवार यांनी स्वतःच माढ्यामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या माघारीमुळे पुन्हा एकदा ही गटबाजी उफाळून येऊ शकते," असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं होतं.

त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर माढ्यामधून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेंस अनेक दिवस कायम राहिला. शेवटी संजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली.

परिणामी आता या ठिकाणी कोण बाजी मारणाक याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

पाहा LIVE कव्हरेज इथे -

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
लोकसभा निवडणुकीचे निकाल: ताजे आकडे आणि विश्लेषण

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)