बारामती लोकसभा निकाल : सुप्रिया सुळे 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस, सुप्रिया सुळे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुप्रिया सुळे

बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. दिड लाखापेक्षा जास्त मतांनी त्या विजयी झाल्या आहेत.

भाजपच्या उमेदवार कंचन कुल यांचा त्यांनी 1,55,774 मतांनी पराभव केला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकलवाटपाच्या उपक्रमातून, तसंच ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर, महिलांचे विविध कार्यक्रम यातून सुप्रिया सुळे सतत लोकसभा मतदारसंघात उपलब्ध राहिल्या आहेत.

संसदेत अतिशय अभ्यासू भाषणातून त्यांनी उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार दोनवेळा पटकावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पुरंदर, खडकवासला मतदारसंघात फटका बसला होता.

तर कांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत. त्यांचं शिक्षण बी. ए. हिंदी , शारदानगर महाविद्यालयातून झालेलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत.

कुल कुटुंबीय १९६२ पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे १९९० ते २००१ दरम्यान आमदार होते त्यांच्या अकाली निधनानंतर कांचन कुल यांच्या सासू रंजना कुल या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे २०१४ साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण जिंकतं याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)