नरेंद्र मोदी सरकार 2.0 : अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 58 मंत्र्यांनी घेतली शपथ

पाहा हा शपथविधी सोहळा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमडळात यंदा भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात गेल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, रामविलास पासवान यांचा समावेश होता.

Image copyright Twitter / Narendra Modi
प्रतिमा मथळा मोदी कॅबिनेट 2.0

भाजपसह शिवसेना, अकाली दलासारख्या रालोआतील इतर पक्षांचे सदस्यही त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार आहेत.

सर्वांत ताजे अपडेट्स

Image copyright ANI
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेताना

विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलंय. पण या सगळ्या उत्सवी वातावरणापासून नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन या मात्र दूर आहेत आणि अलिप्तही. जसोदाबेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना शपथविधीचं आमंत्रण नाहीये आणि त्या टीव्हीवरही हा कार्यक्रम पाहणार नाहीयेत नाहीत. असं का? वाचा ही बातमी

Image copyright Twitter / @BJP4India
प्रतिमा मथळा मोदी यांच्या आई मोदी यांचा शपथविधी पाहताना

दरम्यान, मोदी यांच्या आई हिराबेन यांनी हा सोहळा त्यांच्या घरी पाहिला. भाजपने त्यांचा हा सोहळा पाहतानाचा फोटो शेअर केला आहे.

Image copyright Twitter / @BJP4India
प्रतिमा मथळा राजनाथ सिंह शपथ घेतल्यानंतर सही करताना
Image copyright ANI
प्रतिमा मथळा अमित शहा शपथ घेताना
Image copyright ANI
प्रतिमा मथळा नितीन जयराम गडकरी शपथ घेताना
Image copyright ANI
प्रतिमा मथळा निर्मला सीतारामन शपथ घेताना
Image copyright Twitter / @BJP4India
प्रतिमा मथळा पीयूष गोयल शपथ घेताना. यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता, त्यामुळे त्यांच्याकडे अर्थ खातं सोपवण्यात येऊ शकतं
Image copyright Twitter / @BJP4India
प्रतिमा मथळा स्मृती इराणी शपथ घेतल्यानंतर सही करताना
Image copyright Twitter / @BJP4India
प्रतिमा मथळा राष्ट्रपती भवनाच्या आवारात उपस्थित मंडळी
  • मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन या आजचा शपथविधी सोहळा पाहणार नाही आहेत. अधिक माहितीसाठी वाचा ही बातमी
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
  • मावळत्या सरकारमधल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज कार्यक्रमाला पोहोचल्या. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही आणि यंदा त्या मंत्रिमंडळात असतील की नाही, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तीश यांना या शपथविधी सोहळ्याविषयी काहीतरी सांगायचंय...

प्रतिमा मथळा मी शपथ घेतो की... - आजचं कार्टून
  • या शपथविधीसाठी मॉरिशस, किरगिस्तान आणि बिमस्टेक (अर्थात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान), या देशांचे प्रमुखही उपस्थित.
  • नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड तसंच अपना दल हे पक्ष मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे. केवळ एकच पद मिळाल्यानं नितीश कुमार नाराज असल्याचं वृत्त आहे. नितीश कुमार सोहळ्याला उपस्थित.
Image copyright ANI
प्रतिमा मथळा नितेश कुमार
  • आज शपथ घेणारे संभाव्य मंत्री 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान निवासस्थानी संध्याकाळी 4.30 वाजता नरेंद्र मोदी यांना भेटले.

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणते चेहरे?

गेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदे कायम राहातील असे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असं मानलं जात आहे.

गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती.

आता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

दरम्यान, उत्तर गोवा मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेत जाणारे श्रीपाद नाईक यांना यंदा पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा श्रीपाद नाईक

पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कारभार) राहिलेले नाईक यांनी ANI शी बोलताना सांगितलं, "मी आभार मानतो पंतप्रधान मोदींचे की त्यांनी मला पुन्हा सरकारमध्ये घेऊन देशसेवेची संधी दिली. मला शपथविधीसाठी बोलावणं आलं आहे, मात्र अजूनपर्यंत कुठलं खातं मिळेल, हे सांगण्यात आलेलं नाही."

शेजारी राष्ट्राध्यंक्षांचं आगमन

या देशांच्या अध्यक्षांचं आगमन या शपथविधी सोहळ्यासाठी होऊ लागलं आहे.

Image copyright Twitter / @IndianDiplomacy
प्रतिमा मथळा नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओळी
Image copyright Twitter / IndianDiplomacy
प्रतिमा मथळा किरगीझ रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष सुरॉन्बे जीनबेकेव यांचं स्वागत करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी
Image copyright Twitter / IndianDiplomacy
प्रतिमा मथळा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांचंही आगमन झालं आहे
Image copyright Twitter / IndianDiplomacy
प्रतिमा मथळा म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु विन मायइंत
Image copyright Twitter / IndianDiplomacy
प्रतिमा मथळा भुटानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग यांचं स्वागत एअरपोर्टवर करण्यात आलं.

ममता बॅनर्जी उपस्थित राहाणार नाहीत

"शपथविधी कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो, कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकशाहीचा सन्मान कमी करण्याचा नाही," असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथविधीला उपस्थित राहाण्यास नकार दिला आहे.

"नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमचं अभिनंदन. घटनात्मक आमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी कार्यक्रमाला येण्याचा माझा विचार होता. मात्र भाजपकडून बंगालमधील राजकीय हिंसाचारात 54 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. हे धादांत खोटं आहे," असं त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनी ट्वीट केलं आहे.

राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांना वंदन केले.

नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला नमन केले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिस्थळालाही भेट दिली.

Image copyright Twitter / @NarendraModi
प्रतिमा मथळा मोदी राजघाटवर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)