महाराष्ट्र अर्थसंकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला होता का?

फडणवीस, मुनगंटीवार

देवेंद्र फडणवीस सरकारचा निवडणुकीपूर्वीचा अखेरचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत सादर केला.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.

पाहा अर्थसंकल्पीय भाषण इथे

अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडतील.

मुनगंटीवारांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

 • गेल्या 4 वर्षांत वाघांच्या संख्येत 25 टक्के वाढ
 • राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना. यासाठी 25 कोटी रुपये मंजूर. 
 • अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत उभारणार. तसंच रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयेंची तरतूद
 • लोकमान्य टिळकांचा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये पुतळा उभारणार
 • कोतवालांच्या मानधनात 50 टक्के वाढ. 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या कोतवालांच्या मानधनात तिप्पट वाढ
 • महिलांच्या सुरक्षेसाठी 'महिला सुरक्षितता पुढाकार' योजना राबवणार, यासाठी 252 कोटी रुपये राखीव.
 • जलयुक्त शिवार अभियानातंर्गत 6 लाख 2 हजार मृद आणि जलसंधारणाची कामं पूर्ण. त्या माध्यमातून 26.90 TMC पाणीसाठा क्षमता निर्माण. या योजनेवर 8 हजार 946 कोटी खर्च.
 • 2 हजार 61 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी करण्यात आली, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतिपथावर.
 • ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी 36 वसतिगृह सुरू करण्यात येतील. याशिवाय ओबीसी महामंडळासाठी 200 कोटी रुपये राखीव. 
 • राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद
 • 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार
 • समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यांमधून जाणार. 1 जानेवारी 2019 पासून काम सुरू करण्यात आलं आहे.
 • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचं अंतर कमी करण्याचा आराखडा प्रस्तावित, त्यासाठी 6 हजार 695 कोटी रुपये खर्चाचा अंदाज. 
 • गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ मिळेल.
 • राज्यातल्या सर्व गावांतील गावठाणची मोजणी 36 महिन्यांत पूर्ण करणार. 
 • 66 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.
 • रोजगार हमी योजनेअंतर्गत काही नियम शिथिल करण्यात आले.
 • 1,635 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शेळी-मेंढीसाठी चारा छावण्या प्रथमच सुरू करण्यात आल्या आहेत.
 • कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 6,410 कोटी रुपयांची तरतूद.
 • गेल्या 4 वर्षांत 'मागेल त्याला शेततळे' या योजनेअंतर्गत 1 लाख 67 हजार शेततळी पूर्ण.

दरम्यान, सभागृहात अर्थसंकल्प सादर होण्याआधीच तो फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.

काय झालं नेमकं सभागृहात?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)