दलाई लामा : महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्याबद्दल क्षमस्व

दलाई लामा Image copyright Hindustan Times/getty

माझी उत्तराधिकारी महिला झाली तरी चालेल पण ती आकर्षक असावी, असं वक्तव्य दलाई लामा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं होतं.

त्या वक्तव्यानंतर जगभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. त्या टीकेनंतर दलाई लामा यांनी माफी मागितली आहे.

माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो असं दलाई लामा म्हणाले आहेत.

मी गमतीने जे विधान केलं, त्यामुळे अकारण वाद ओढावला असं त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दलाई लामा यांच्या कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात असं म्हटलं आहे की, भौतिक जगाच्या मर्यादा आणि तिबेटियन बौद्ध परंपरेचा विचार यांच्यातल्या परस्परविरोधाची पूर्ण जाणीव आहे.

पण तरीदेखील असं होऊ शकतं की एखादं वक्तव्य एका सांस्कृतिक संदर्भात गमतीशीर वाटतं पण तेच वक्तव्य दुसऱ्या भाषेतून अनुवादित झालं तर त्यातली गंमत निघून जाते.

महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी दलाई लामांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

Image copyright Getty Images

याच मुलाखतीमध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना नैतिक मूल्यं नाहीत, असं म्हटलं होतं. या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)