कारगिलच्या हिरोला उपेक्षित असल्यासारखं का वाटतंय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाकिस्तानची घुसखोरी उघड करणाऱ्या कारगिल हिरोला उपेक्षित असल्यासारखं का वाटतंय?

कारगिल युद्धाला 20 वर्षं पूर्ण होत आहेत. कारगिलजवळ राहणाऱ्या ताशी नामग्याल यांच्यासारखे अनेक स्थानिक नागरिक या युद्धातले हिरो ठरले होते.

कारगिलच्या पर्वतांवर चढाई करत पाकिस्तानी सैनिकांनी भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर युद्धाला तोंड फुटलं. पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली हे पहिल्यांदा ज्यांनी पाहिलं आणि भारतीय सैन्याला कळवलं ते ताशी नामग्याल आजही गारकोन गावातच राहतात. पण ताशी यांच्यासारख्या रहिवाशांचं म्हणणं आहे की कारगिलनंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय.

बीबीसीने या गावात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. पण भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन विजयमध्ये कारगिल भागातील स्थानिकांनी केलेली मदत अमूल्य आहे. स्थानिक लोकांच्या विकासासाठी काही वर्षांपासून आर्मी सद्भावना मोहीम राबवतेय.

या गावातही अनेक आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांचे उपक्रम राबवण्यात आलेयत. तर भारतीय प्रशासनानेही प्रतिक्रिया दिली आहे की, येत्या 15 ऑगस्टला ताशी यांच्यासारख्या गावकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी आणि तिथे पर्यटन सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)