ManVsWild मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकल्यामुळे 'जिम कॉर्बेट'ला काय फायदा होणार?

नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स Image copyright DISCOVERY
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिस्कवरी 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या 12 ऑगस्टच्या (रात्री 9 वाजता) एपिसोडमध्ये दिसणार आहेत.

डिस्कव्हरी चॅनेलवरील कार्यक्रम Man vs Wild मधील प्रसिद्ध चेहरा बेअर ग्रिल्स यांनी उत्तराखंडच्या 'जिम कॉर्बेट टायगर रिझर्व्ह'च्या ढिकाला परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही दिवस वाट पाहिली.

बेअर ग्रिल्स यांना इथं फसवणूक झाल्यासारखं वाटलं असेल. कारण जंगलातील कठीण परिस्थितीला सहजरित्या कशापद्धतीनं सामोरं जाता येऊ शकतं, हे सांगणारा तो टीव्ही सेलिब्रिटी आहे. जंगलात तुमच्याकडे खायला काही नसेल, तर कशा पद्धतीनं एखाद्या सापाची मान पकडून त्याला चावून खाता येतं, हे तो सांगतो.

पण जिम कॉर्बेटमध्ये त्यांना ढिकाला परिसरात राहावं लागलं. इथं पर्यटकांसाठी 33 खोल्या आहेत आणि जंगली प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांना विजेच्या तारांचं कुंपण आहे.

इथले कच्चे रस्ते, दूरवर पसरलेलं गवत आणि नदीच्या प्रदेशाची तुम्ही सैर करू शकता, पण ती फक्त अधिकृत वाहनांमध्ये. या वाहनांमधून एक सेंकदांसाठी उतरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तेव्हा तुम्ही बेअर यांच्या परिस्थितीचा अर्थ समजू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं पोहोचल्यानंतरही बेअर यांच्या अडचणी कमी झाल्या नाही. सकाळपासून ढिकाला परिसरात पाऊस पडत होता. खरं तर तेव्हा पावसाळा नव्हता. पण, उत्तराखंडमध्ये कधीकधी वातावरण अचानक बदलू शकतं.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा बेअर ग्रिल्स

मोदी कालागढ इथून एक बोट घेऊन ढिलाका इथं पोहोचले आणि जंगलातील एका जुन्या विश्रामगृहात त्यांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली.

हे विश्रामगृह ढिकालातील सर्वांत उत्तम संरचना आहे. जिम कॉर्बेटचे तुम्ही गुगलमध्ये ब्लॅक आणि व्हाईट फोटो मिळतील.

जिम कॉर्बेट नाव कसं पडलं?

जिम कॉर्बेट भारताचा पहिला व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहे. उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊं या दोन्ही भागात हा प्रकल्प आहे. गवताची मैदानं, पर्वतरांगांनी हा प्रदेश वेढलेला आहे. याच भागात सापाच्या वेटोळ्यासारखी रामगंगा नदी वाहते.

रणथंबोरमध्ये वाघांना पाहणं सोपं असू शकतं, पण, कॉर्बेटसारखं जगात क्वचितच एखादं असेल.

Image copyright Twitter

1936मध्ये तत्कालीन संयुक्त प्रांतात तत्कालीन गव्हर्नर मेल्कॉम हॅली यांच्या नावावरून याचं हॅली नॅशनल पार्क असं नामकरण करण्यात आलं.

पण, नंतर या पार्कला जिम कॉर्बेटचं नाव देण्यात आलं, ज्यांची आजही उत्तरांखडमध्ये आठवण काढली जाते.

जिम कॉर्बेट प्रसिद्ध शिकारी होती. त्यांनी वनसंवर्धनाचं काम केलं होतं. तसंच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम केलं.

Image copyright DISCOVERY

जिम कॉर्बेट यांनी केवळ आपल्या 16-एमएम या कॅमेऱ्यातून जंगलांचं चित्रिकरणच केलं नाही, तर जंगलांवर पुस्तकंही लिहिली. या सगळ्यांचा समावेश 'क्लासिक' या प्रकारात होतो.

'मॅन इटर्स ऑफ कुमाऊं', 'द टेंपल टायगर', 'मोअर मॅन इटर्स ऑफ कुमाऊं', 'द मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग', 'माय इंडिया' आणि 'जंगल लोअर' ही त्यांची काही पुस्तके.

1955मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर या पार्कचं नामकरण कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलं. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर ते भारताचे पहिले पर्यावरण संरक्षणवादी होते.

इथेच 1973मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी वाघांना वाचवण्यासाठी 'प्रोजेक्ट टायगर'ची सुरुवात केली होती.

जिम कॉर्बेटचं ढिकाला क्षेत्र

आता पुन्हा ManVsWild कडे वळूया. काही वेळानंतर पावसाचा वेग मंदावला, त्यामुळे बेअर आणि त्यांच्या टीमनं ठरवलेल्या जागेवर बेअर आणि मोदींना शूटिंगची संधी मिळाली.

'गेथिया रो' या नावानं ओळखला जाणाऱ्या रामगंगा नदीचा किनारा आणि ढिकाला परिसराला तिन्ही बाजूनं वेढलेल्या गवताच्या मैदानात पंतप्रधान मोदींसह शूटिंग करण्यात आलं.

Image copyright Twitter

पंतप्रधान यायच्या अगोदर बेअर यांना विनासुरक्षा ढिकाला परिसराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. कारण हे जोखमीचं काम होतं, असं उत्तराखंडच्या वनविभागातील सुत्रांनी सांगितलं.

खरं तर एका दशकापूर्वी ढिकाला परिसराला विजेचं कुंपण करणं गरजेचं होतं. तेव्हा एका वाघिणीनं परिसरात येऊन एका हॉटेल मालकाला जिवंत मारलं होतं. या परिसरात अचानकपणे जंगली हत्तींचा वावर दिसून आला आहे.

जिम कॉर्बेट अभयरण्यातील 'गेथिया रो' हा परिसर इथल्या सर्वांत प्रसिद्ध वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचं घर आहे. ही वाघीण 'पाडवाली' या नावानं प्रसिद्ध आहे.

Image copyright Getty Images

पण त्या दिवशी हे कुटुंब बाहेर पडलं नाही. कॉर्बेटच्या या परिसरात फेब्रुवारी महिन्यात हत्ती दिसत नाहीत. सामान्यपणे मार्च महिन्याच्या मध्यात हत्तींची झुंड या परिसरात दिसते. पण, त्यादिवशी हत्ती न दिसल्यामुळे या शूटिंगसाठी ते चांगलं होतं.

आमिर खानच्या थ्री इडियट्स चित्रपटाला लडाखच्या पॅनगाँग तलावाला फायदा झाला तसा फायदा या कार्यक्रमामुळे इथल्या प्रदेशाला फायदा होईल यात आजिबात शंका नाही.

पण, या जागांना अधिकच्या प्रचाराची खरंच गरज आहे का, हा प्रश्न आहे.

लडाख प्रशासनानं पर्यटकांच्या दबावामुळे अगोदरच पॅनगाँग परिसरात कॅम्प लावायला बंदी घातली होती.

Image copyright Getty Images

बेअर ग्रिल्स इथं येण्यापूर्वीही जिम कॉर्बेट जगभरात प्रसिद्ध व्याघ्र संवर्धन प्रकल्प होता. जसं की एक वनाधिकारी सांगतात, तुम्ही ताजमहालाला अधिक लोकप्रिय नाही बनवू शकत, की बनवू शकता?

मला वाटतं की, बेअर ग्रिल्स यांची थोडी निराशा झाली असेल. ते ज्या जंगलाच्या शोधात होते, ते त्यांना मिळालं नाही.

पण, मग मनात विचार येतो की, भारतात या शूटिंगसाठी आदर्श जागा कोणती होती?

कदाचित चंबळचा खडकाळ परिसर. पण, हा परिसर बेअर ग्रिल्ससाठीसुद्धा अवघड ठरला असता. चंबळमधील अतिशय गुंतागुंतीच्या परिसरात आत गेल्यानंतर बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळेच याला मनुष्यभक्षक समजलं जातं. तसंही साप खाऊन-खाऊन कुणी किती दिवस जिवंत राहू शकतं?

(लेखातील लेखकाची मतं वैयक्तिक आहेत. यातील तथ्य आणि विचार बीबीसीचे नाहीत. तसंच याची जबाबदारी बीबीसी घेत नाही.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)