चांद्रयान 20 ऑगस्टपर्यंत असं उतरेल चंद्रावर

चांद्रयान2
प्रतिमा मथळा चांद्रयान2 चौथ्या टप्प्यात चंद्राच्या कक्षेत जाऊन पोहोचेल.

चांद्रयान 2 यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेलं आहे. 20 ऑगस्टपर्यंत चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचेल, असं इस्रोचं म्हणणं आहे. सध्या हे यान पृथ्वी ते चंद्र या टप्प्यात आहे, असंही इस्रोतर्फे सांगण्यात आलं आहे.

हा प्रवास नेमका असतो तरी कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?

22 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत चांद्रयान2 पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आलं होतं.

चांद्रयानाने पृथ्वीच्या कक्षेत अनेक फेऱ्या मारल्यानंतर हळूहळू चंद्राच्या दिशेने रवाना झालं आहे. चांद्रयान 2 हळूहळू पृथ्वीपासून दूर जातं आहे आणि चंद्राच्या जवळ जातं आहे.

14 ऑगस्टला रात्री 2 वाजता चांद्रयान2ला एक जोरदार धक्का देण्यात आला आहे. ज्यामुळे चांद्रयान2चं रॉकेट प्रज्वलित झालं.

चांद्रयान2 मध्ये आधीपासूनच रॉकेट बसवण्यात आलं आहे. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत असताना रॉकेटच्या साह्याने विशेष फायरिंग केलं जातं.

Image copyright iSRO
प्रतिमा मथळा चांद्रयान2

या फायरिंगला ट्रान्स लूनर इंजेक्शन म्हटलं जातं. याबरोबरीने 'लूनर ट्रान्सफर ट्रांजेक्टी'चा उपयोग होतो आहे.

विज्ञानाचे जाणकार पल्लव बागला सांगतात की, जेव्हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने जातं तेव्हा जी वाटचाल केली जाते, त्याला लूनर ट्रान्सफर ट्रांजेक्टी म्हटलं जातं.

ही प्रक्रिया किती कठीण?

हा टप्पा एका विशिष्ट कालावधीत पार केला जातो.

Image copyright iSro
प्रतिमा मथळा पृथ्वीचा पहिला टप्पा पार करताना चांद्रयान2

हे काम ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात कठीण आहे. सुरुवातीला पृथ्वीपासून 276 किलोमीटरचं अंतर निश्चित करावं लागतं. त्याचं उद्दिष्ट असतं 3.84 लाख किलोमीटर. तुमचं लक्ष्य असं हवं की योग्य दिशेत लक्ष्याचा वेध घेतला जाईल.

चांद्रयान2 च्या या प्रक्रियेत किती जोखीम आहे?

उपग्रह लॉन्च झाल्यापासून चंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सगळे टप्पे जोखीमेचे असतात, असं पल्लव बागला सांगतात. 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचणं आणि सॉफ्ट लँडिंग होणं अवघड अशी प्रक्रिया आहे.

योग्य ठिकाणी लक्ष्यभेद झाला नाही तर चांद्रयान2 चंद्राच्या जवळ जाऊनही दूर राहू शकतं.

Image copyright iSRO
प्रतिमा मथळा पाच फेऱ्या पूर्ण केल्यानंतर चांद्रयान2 पृथ्वीच्या कक्षेबाहेर जातं तेव्हा असं दिसतं.

चांद्रयान2च्या वेगाबाबत पल्लव बागला सांगतात की, आता यानाला प्रतितास 39 हजार किलोमीटरचा वेग देण्यात आला आहे. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर हा वेग कमी करण्यात येईल.

या वेगाचं आकलन एका उदाहरणाने करून घेऊया. या वेगाने तुम्ही एका तासात काश्मीरहून कन्याकुमारीला सहा वेळा जाऊ शकता.

चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर ऑर्बिटरपासून वेगळं होईल.

शेवटच्या टप्प्यात चांद्रयान2 सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

'विक्रम'ला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे, जेणेकरून रोवरचं नुकसान व्हायला नको.

रोवरचं नाव प्रज्ञान आहे. ते सहा पायांचं रोबोटिकल व्हेईकल आहे. जे चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन फोटो काढण्याचं काम करेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)