नरेंद्र मोदी यांना 'देशाचा पिता' म्हटल्यामुळे अमृता फडणवीस टिकेच्या धनी

नरेंद्र मोदी, अमृता फडणवीस, भाजप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमृता फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एक ट्वीट मात्र सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. ते ट्वीट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं.

पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या, 'देशाचे पिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी ते देशवासीयांना सदैव प्रेरित करतात', असं अमृता यांनी म्हटलं आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अमृता फडणवीस यांचं ते ट्वीट

मात्र अमृता यांनी मोदींचा उल्लेख 'देशाचे पिता' असा केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे. आणि त्यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.

हे चाटूगिरीचं सर्वोत्तम उदाहरण आहे, असं एका नेटिझनने म्हटलं आहे.

Image copyright Twitter

"देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. हे देशाचे पिता नवीनच आहेत. मोदी देशाचे पिता केव्हा झाले? बेरोजगारी झपाट्याने वाढत असताना, अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना समाजाचा नेमका कोणता विकास झाला?" असा सवाल एका नेटिझनने केला आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अमृता यांच्या ट्वीटवरील प्रतिक्रिया

राष्ट्रपिता फक्त महात्मा गांधी आहेत, असं एका नेटिझनने म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्या आणि आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी अमृता यांना उद्देशून ट्ववीट केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्याकडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदी यांचा 'देशाचे पिता' म्हणून उल्लेखाला माझा आक्षेप आहे. महात्मा गांधी हे नेहमीच राष्ट्रपिता राहतील. आमच्या भावना दुखावू नका."

Image copyright Social media
प्रतिमा मथळा अंजली दमानिया यांचं ट्वीट

एका नेटिझनने भाजप प्रवक्ते संबिता पात्रा आणि कन्हैया कुमार यांच्यातील एका वाहिनीवरील संभाषणाची लिंक दिली आहे. यात कन्हैया कुमार संबिता पात्रा यांना म्हणतात- "मोदीजी आपके चाचा है क्या?" यावर संबित पात्रा उत्तर देतात, "मेरे चाचा नहीं, इस देश के बाप हैं."

Image copyright Social media
प्रतिमा मथळा कन्हैया कुमार आणि संबिता पात्रा

"राष्ट्रपिता एकच आहेत आणि त्यांचं नाव आहे महात्मा गांधी. प्लीज हे ट्वीट डिलिट करा. हा महात्मा गांधीजींचा अपमान आहे," असं एकाने म्हटलं आहे.

Image copyright Social media

"तुम्ही कधी शाळेत गेल्या होत्या का? देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. दुसऱ्या कोणीही हा मान देण्याइतकं लायक नाही. कृपया भारताबद्दल आणि देशातल्या नेत्यांबद्दल थोडं वाचा," असा सल्ला @IndianTirangaa नावाच्या एका नेटिझनने दिला आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा ट्वीट

"तुम्ही तुमचं बोला. राष्ट्रपिता म्हणून मोदीजींना आमच्यावर थोपवू नका," असं समीर शेख यांनी म्हटलं आहे.

Image copyright Social media
प्रतिमा मथळा ट्वीट

"फादर ऑफ कंट्री? हे कधी ठरलं?" असा सवाल एका नेटिझनने केला आहे.

तुम्हाला अमृता फडणवीस यांच्या ट्वीटबद्दल काय वाटतं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)