गांधी @150: वाळू शिल्प ते पोस्टल स्टँप, बापू असे झाले जगभरात ट्रेंड

सुदर्शन यांचा वाळू शिल्प Image copyright Twitter
प्रतिमा मथळा सुदर्शन यांचा वाळू शिल्प

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रम होत असताना ट्विटर जगातही आज बापू 'ट्रेंडिग' आहेत. #GandhiJayanti, #FatherOfTheNation, #GandhiAt150, #MahatmaGandhi हे हॅशटॅग्स आज सकाळपासून ट्विटरवर ट्रेंडिग आहेत.

काँग्रेस आणि भाजपमध्ये दिल्लीत मोठ्या पदयात्रा काढण्यावरून चढाओढ सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या सोशल मीडिया सेलने गांधी जयंती विषयी अनेक ट्वीटस केली आहेत.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा काँग्रेसचं ट्वीट

गांधीजींना तुम्ही विसरू नका, असं म्हणत काँग्रेसने ट्वीट केलंय.

शिवाय काँग्रेसतर्फे काढण्यात येणारी पदयात्रा, राजघाटावर गांधीजींना विविध नेत्यांनी वाहिलेली श्रद्धांजली याविषयीही काँग्रेसने ट्वीट केलंय.

भाजपने गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्त साधत भारत 'हागणदारीमुक्त' झाल्याचं जाहीर करणारं ट्वीट केलंय.

भाजपच्या ट्विटर हँडलने आणखी एक वेगळी गोष्ट ट्वीट केलीय, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'न्यूयॉर्क टाईम्स'साठी लिहिलेल्या लेखाची लिंक.

भारत आणि जगासाठी गांधीजी कसे गरजेचे आहेत, याविषयीचा लेख पंतप्रधान मोदींनी लिहिला आहे.

Image copyright NewYorkTimes
प्रतिमा मथळा न्यूयॉर्क टाइम्समधील पंतप्रधान मोदींचा लेख

गांधीजींच्या 150व्या जयंती निमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या @IndianDiplomacy या ट्विटर हँडलने गांधीजींचा जीवनक्रम सांगणारा एक व्हीडिओ ट्वीट केलाय.

तर माल्टामध्ये गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्ताने विशेष स्टँप्सचं अनावरण करण्यात आलं. त्याबद्दलचं ट्वीट तिथल्या भारतीय दूतावासाने केलंय.

Image copyright Twitter / IndiainMalta

पॅलेस्टाईन सरकारनेही अशाच एका विशेष स्टँपचं अनावरण केलंय.

Image copyright Twitter / ROIRamallah

तर लेबनॉनमधल्या भारतीय दूतावासानेही गांधीजयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमांबाबत ट्वीट केलंय.

Image copyright Twitter / IndiainLebanon
प्रतिमा मथळा लेबनॉनमध्ये गांधीजींच्या चित्रांचं प्रदर्शन लावण्यात आलेलंय

पीआयबी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने गांधींजींचा नोआखालीतल्या दंगलींनंतरचा 1946मधला व्हिडिओ ट्वीट केलाय.

पुण्याची फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTII) आणि पॅरिसच्या La Femis ने गांधीजींवर तयार केलेला लघुपट शेअर केलाय.

हिंदुस्तान टाईम्स या वर्तमानपत्राने आज गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त पहिलं पान विशेष छापलंय. यामध्ये त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी 1958 मध्ये गांधीजींच्या निधनाला 10 वर्षं झाल्याच्या निमित्ताने लिहिलेला लेख पुन्हा छापण्यात आलाय. हिंदुस्तान टाईम्सचे एक्झिक्युटिव्ह एडिटर आणि ज्येष्ठ पत्रकार सचिन काळबाग यांनी ही लिंक ट्वीट केलीय.

Image copyright Hindustan Times

एअर इंडियाने गांधींजींना एक अनोखी मानवंदना दिलीये. गांधी जयंतीच्या निमित्ताने एअर इंडियाच्या VT - CIO A320 विमानाच्या शेपटावर बापूंचं चित्र रंगवण्यात आलं आहे.

Image copyright Twitter / Air India
प्रतिमा मथळा गांधीजींचं चित्र एअर इंडिया विमानावर

सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ ट्वीट केलाय. गांधीजींची स्वच्छता आणि आरोग्याविषयीची तत्त्वं सांगत सचिनने लोकांना याविषयीचं आवाहन केलंय.

सद्य परिस्थितीवर टीका-टिप्पणी करणाऱ्या अमूलने आपल्या जाहिरातीतून बापूंना आदरांजली वाहिली आहे

Image copyright Twitter / @Amul_Coop

तर वाळूतून शिल्प साकारणारे कलाकार - सुदर्शन यांनीही आपल्या वाळूच्या शिल्पांमधून गांधीजींचं स्मरण केलंय.

Image copyright Twitter @Sudarsand
प्रतिमा मथळा सुदर्शन यांचा वाळू शिल्प
Image copyright Twitter / Sudarsansand
Image copyright Twitter / @IndiaUNGeneva
प्रतिमा मथळा संयुक्त राष्ट्रांच्या भारतीय दूतावासात अशी रोषणाई करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना फादर ऑफ इंडिया म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. अमृता फडणवीसांनीही मोदींना भारताचे पिता म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. व्यंगचित्रकार मंजुल यांनी त्यांच्या कार्टूनमधून याविषयच भाष्य केलंय.

Image copyright Twitter / @Manjultoons

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)