BBC 100 Women: महिलांचं भविष्य कसं असेल? दिल्लीत आज जागतिक चर्चासत्र

100 वूमन

भविष्यकाळ महिलांसाठी कसा असेल? फक्त तुमच्या आजूबाजूच्याच महिलांचं नाही तर जगभरातल्या महिलांचं भविष्य कसं असेल?

भविष्याची दिशा बदलू पाहणाऱ्या जगातल्या 100 महिलांची यादी बीबीसीनं प्रसिद्ध केली आहे. BBC 100 Women अशा महिला आहेत, ज्यांनी भविष्य पाहिलं आहे. या अशा महिला, ज्या जगाचं भविष्य बदलू शकतात, ज्या जगाला नवीन आणि उत्तम भविष्य देऊ शकतात.

यावर्षीचा #100Women सीरिजचा प्रश्न आहे - तुमच्या अवतीभवतीच्या महिलांसाठी येणारा काळ कसा असेल? 2013 पासून सुरू झालेली बीबीसीच्या 100 वुमन मालिकेची ही मोहीम तुमच्यापर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या महिलांच्या गोष्टी घेऊन येते. या महिला जगभरातील इतर महिलांना प्रेरणा देण्याचं काम करत आल्या आहेत.

कोण-कोण आहे यंदाच्या 100 वुमेनमध्ये?

मागच्या सहा वर्षांमध्ये 100 वुमन मालिकेअंतर्गत आम्ही विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सन्मानित केलं आहे. मेक-अप उद्योजक बॉबी ब्राऊन, संयुक्त राष्ट्रांच्या सहसरचिटणीस अमीना मोहम्मद, सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफजाई, जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्स, सुपरमॉडेल अॅलेक वेक, संगीतकार अलिशिया कीज आणि ऑलिंपिक चँपियन बॉक्सर निकोला अॅडम्स यांचा त्यात समावेश आहे.

2019 मध्ये बीबीसी 100 वुमेन सीरीजमध्ये 'द फिमेल फ्यूचर' म्हणजेच महिलांच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. फ्यूचरिझम म्हणजेच भविष्य पाहणं आणि सांभाळण्याची प्रक्रिया. पितृसत्ताक समाजात आजपर्यंत भविष्य बनवणं आणि सांभाळण्याची जबाबदारी फक्त पुरुषच गेत आले आहेत. पण महिलांचं भविष्य त्यांच्याच हातात असलं तर आयुष्य कसं असेल, हे यावर्षीच्या 100 वुमेन या बीबीसीच्या विशेष सिरीजमध्ये सांगण्यात येईल.

या मालिकेचं वैशिष्ट्य काय आहे?

बीबीसी 100 वुमेन - सीजन 2019चं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दोन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पहिला कार्यक्रम 17 ऑक्टोबरला लंडनमध्ये झाला तर दुसरा कार्यक्रम 22 ऑक्टोबरला दिल्लीत होईल. या कॉन्फरन्समध्ये आपापल्या क्षेत्रातील दिग्गज महिलांची भेट आम्ही तुमच्याशी घडवून देऊ.

विज्ञान, कला, मीडिया, सिनेमा, शिक्षा, फॅशन, धर्म, स्पेस आणि लिंग या मुद्द्यांवर जोरदार पकड ठेवून आहेत. भविष्य पाहणं आणि समजण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे.

यापैकीच, एक ईराणी उद्योजक आहेत ज्यांनी स्मार्टफोन आणि 5Gच्या जमान्यात भविष्यातील शाळा कशा असतील, हे तुम्हाला सांगतील. स्पेस टूरिझ्मसारखी आगळीवेगळी संकल्पनेशी तुमची ओळख बंगळुरूमधल्या एक अभियंता करून देतील. फॅशनच्या जगात नाव कमावणाऱ्या इस्रायलच्या एका कलाकाराची कलाही तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्या 3D फॅशनची बारकाई तुम्हाला समजावून सांगतील. आपापल्या क्षेत्रातल्या रथी-महारथी असलेल्या या महिला 2030 मध्ये जग कसं असेल, याची प्रचिती तुम्हाला देतील.

या कॉन्फरन्समध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही या पाहुण्यांशी संवाद साधायला मिळेल. या कॉन्फरन्समध्ये एक VR एक्सपिरियन्स झोन असेल. याठिकाणी तुम्हाला व्हर्चुअल रिअलिटीतील जग अनुभवायला मिळेल.

बीबीसी 100 वुमेनचा 2019चा सिझन तुमच्यासाठी अभूतपूर्व अनुभव घेऊन येणार आहे. भविष्याप्रति असलेला तुमचा विचार यामुळे बदलून जाईल. भविष्याकडे वेगळ्या प्रकारे पाहण्यास तुम्हाला तो भाग पाडेल.

दिल्ली कॉन्फरन्सबद्दल थोडक्यात -

कधी -

22 ऑक्टोबर 2019

कुठे -

गोदावरी ऑडिटोरियम,24-25, लोधी इंस्टिट्यूशनल एरिया,नवी दिल्ली - 110003

कार्यक्रमचं वेळापत्रक -

पहिलं सत्र - सकाळी 9 ते दुपारी 1

अरण्या जोहर - कविता, समता आणि भविष्य

Aranya Johar - Poetry, equality and the future

राया बिदशहरी (शिक्षण) - भविष्यातील शाळा: कोणताच विषय नसलेली, चार भिंतीपलीकडची

Raya Bidshahri (education) - Schools of the future: No subjects, no school buildings. Reimagining Education in the Exponential Age

साराह मार्टिन्स दा सिल्वा (प्रजननक्षमता)- पुरुषांतील वंध्यत्व: उपाय कोणते?

Sarah Martins da Silva (fertility) - Men's infertility: Can it be fixed? - Defusing the ticking time bomb of male infertility

सुष्मिता मोहंती (अंतराळ आणि विज्ञान) - 21व्या शतकातील अंतराळसफर: सज्ज व्हा

Susmita Mohanty (science and space) - Spaceflight in the 21st Century: Unbuckle your seatbelts and float free

मॅरिलिन वॅरिंग आणि शुभलक्ष्मी नंदी - चर्चासत्र:विनापगाराची कामं करणाऱ्या महिलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

In conversation: Marilyn Waring and Subhalakshmi Nandi (unpaid work) - What if a nation's economy was valued on a woman's unpaid work?

दनित पेलेग (फॅशन) - 3D प्रिंटिंग आणि भविष्यातलं फॅशन तंत्रज्ञान

Danit Peleg (fashion) - Model the future of fashion tech with 3-D printing

दुसरं सत्र - दुपारी 2 ते संध्याकाळी 5.45

पाओला विलारियल (न्याय आणि माहितीची समानता): भविष्यात न्यायप्रक्रिया: येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाचा न्यायप्रक्रियेवर काय परिणाम होईल?

Paola Villareal (justice and data equality) - The future of justice: How will algorithms affect justice systems around the world?

जिना झ्युर्लो (धर्म) - जग बालकांच्या हाती: धर्माचं जागतिक भविष्य

Gina Zurlo (religion) - Babies run the world: The global future of religion

प्रगती सिंह (लैंगिकता आणि लैंगिक ओळख): सेक्सच्या पलीकडे: प्रेम, कुटुंब आणि शारीरिक जवळीक

Pragati Singh (sexuality and gender identities) - Beyond sex: The future of love, family and intimacy

हायफा सदिरी (व्यापार आणि उद्योजकता) - बौद्धिक गुंतवणुकीद्वारे उत्तर आफ्रिकेतल्या तरुणांचं ब्रेन-ड्रेन कसं रोखता येईल?

Hayfa Sdiri (business and entrepreneurship) - How virtual investment could stop North Africa's brain-drain

वासू पीरमलानी (पर्यावरण): पर्यावरण संवर्धनासाठी महिलाचं एक पाऊल: जग वाचवण्यात महिलांची काय भूमिका आहे?

Vasu Pirmlani (environment) - One step for (wo)man, a giant step for mankind: A talk on the Precautionary Principle and a history of the world

नंदिता दास (सिनेमा)- गोऱ्या रंगासाठी सिनेसृष्टी एवढी वेडी का?

Nandita Das (film) - Film and skin obsession: The portrayal of women on screen(s)

*या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार किरकोळ बदल होऊ शकतो. ताज्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)