हरियाणा विधानसभा निवडणूक : भाजपा की काँग्रेस? दुष्यंत चौटालांचं आव्हान उभं ठाकणार का?

दुष्यंत चौटाला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

दुष्यंत चौटाला

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. महाराष्ट्रात सध्या तरी भाजपा आणि शिवसेना सत्तास्थापनेच्या जवळ आहेत.

हरियाणामध्ये मतमोजणी सुरू असून, पहिल्या टप्प्यावरून कोणत्या पक्ष बहुमत मिळवेल हे सांगणे कठीण झालं आहे.

हरियाणात भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत असली, तरी बहुमत न मिळाल्यास जेजेपी या विरोधी पक्षाचे दुष्यंत चौटाला यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.

सध्याच्या घडीला भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्या आहेत. भाजपाला 35 आणि काँग्रेसलाही 35 जागा मिळाल्या आहेत. तर दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाला 10 जास्त जागा प्राप्त झालेल्या आहेत. दुष्यंत चौटाला 10 पैकी 7 जागा जिंकण्याच्या जास्त शक्यता आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेस, जेजेपी, आयएनएलडी आणि अपक्ष उमेदवार मिळून सत्ता स्थापन करतील, असे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी पहिल्या टप्प्यातल्या निकालांवरून सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)