भारत खरंच हागणदारी मुक्त झालाय का?

खुले में शौच से मुक्त Image copyright Getty Images

2 ऑक्टोबर 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं, "आज ग्रामीण भारतातल्या गावांनी स्वतःला हागणदारी मुक्त केलंय."

पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर यावर मोठी चर्चा झाली. पण NSO सर्व्हेमध्ये याविषयीच्या काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत.

भारतातल्या फक्त 71.3 टक्के घरांमध्ये शौचालयं असल्याचं 'भारतातील पेयजल, स्वच्छता आणि घरांची परिस्थिती' या एनएसओच्या नवीन पाहणीमध्ये म्हटलंय. हा दावा सरकारच्या दाव्याच्या अगदी उलट आहे.

पण जुलै ते डिसेंबर 2012 दरम्यानच्या एनएसओच्या पाहणीच्या तुलनेत यावेळी शौचालयांची संख्या वाढल्याचं नमूद करणं गरजेचं आहे.

Image copyright Getty Images

तेव्हा ग्रामीण भारतातील केवळ 40.6 टक्के घरांमध्ये शौचालयं होती. म्हणजे गेल्या 7 वर्षांमध्ये शौचालयांची संख्या जवळपास 30% वाढली आहे.

ओडीएफ - (Open Defecation Free) म्हणजे हागणदारी मुक्त जाहीर होण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांत केली जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

पहिला टप्पा - स्थानिक संस्थांनी स्वतःहून जाहीर करणं

दुसरा टप्पा - मंत्रालयाने तयार केलेल्या क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाद्वारे याची पडताळणी होणं.

या पाहणीमध्ये अशीही काही घरं आहेत जिथे घरात शौचालयं असूनही तिथे राहणाऱ्या कुटुंबियांनी त्या शौचालयाचा कधीही वापर केलेला नाही.

ग्रामीण भागात शौचालय न वापरण्याची कारणं

कारणग्रामीण (%)
मूलभूत सुविधांचा अभाव3,5
स्वच्छ पाण्याचा तुटवडा9,9
अस्वच्छ शौचालयं3,7
कमी शौचालयं0,3
शौचायलाचा वापर इतर कामासाठी1,4
सुरक्षा / प्रायव्हसीचा अभाव0,6
स्वतःची आवड7,6
शौचालय वापरण्यासाठी पैसे नाहीत0,1
इतर72,9
स्रोत: NSO

ग्रामीण भागांमध्ये 3.5% तर शहरी भागांमध्ये 1.7% घरांतल्या सदस्यांनी कधीही शौचालय वापरलेलं नाही.

या पाहणीमध्ये अशीही काही घरं आहेत जिथे घरात शौचालयं असूनही तिथे राहणाऱ्या कुटुंबियांनी त्या शौचालयाचा कधीही वापर केलेला नाही.

Getty
भारतातील 2 चित्र

  • ग्रामीण भागातील4.5 टक्के घरांमध्ये पिण्याचे पाणी नाही.

  • शहरी भागातील2.1 घरांमध्ये हीच स्थिती आहे.

स्रोत: NSO

ग्रामीण भागांमध्ये 3.5% तर शहरी भागांमध्ये 1.7% घरांतल्या सदस्यांनी कधीही शौचालय वापरलेलं नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)