आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती - उद्धव ठाकरे

ो Image copyright ANI

उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात पत्रकारांना संबोधित केलं.

त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढले, मी काही सांगून मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

तसंच आरे कारशेडच्या कामाल स्थगिती देण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबईतल्या आरेच्या जंगलात मेट्रो रेल्वेची कारशेड होणार आहे, त्याल आता स्थगिती देण्यात आली आहे.

भगवा हा आवडता रंग आहे का, असा सवाल विचारल्यावर "हा जन्मभराचा आवडका रंग आहे आणि हा कुठल्याही लॉन्ड्रीत धुतला तरी जाणारा रंग नाही," असं उत्तर ठाकरे यांनी दिलं आहे.

तसंच कामासाठी वर्षा बंगल्यावर जाणार असल्याचही त्यांनी म्हटलंय.

उद्या बहुमत चाचणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी उद्याच म्हणजे शनिवारी होणार आहे. त्याशिवाय सरकारनं हंगामी अध्यक्षांना बादलण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.

सध्या हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आहेत. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांचं नाव हंगामी अध्यक्ष म्हणून सुचवण्यात आलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांनी मंत्रालयातल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)