झारखंड निकालः काँग्रेस- झामुमो बहुमताच्या दिशेने, हेमंत सोरेन बनणार मुख्यमंत्री?

झारखंड. रघुवर दास, हेमंत सोरेन

फोटो स्रोत, Getty Images

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता राखण्यात यश येणार की काँग्रेसला यश मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

गेल्या 5 वर्षांत राज्यात विकासाची गंगा आणल्याचं भाजपचं म्हणणं आहे. झारखंड निवडणुकीत विरोधकांनी बेरोजगारी, मागासवर्गीयांना आरक्षण, वाढतं स्थलातंर, भ्रष्टाचार, कुपोषण आदी मुद्द्यांना प्रचारात जोर देण्यात आला आहे.

याशिवाय झारखंडच्या निवडणुकीत कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, नरेंद्र मोदींची विश्वासार्हता हे मुद्दे परिणामकारक ठरतील, असं मत भाजपचे झारखंडचे प्रवक्ते दीनदयाल वर्णवाल यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

13.15 : रघुवर दास पिछाडीवर

भाजपचे बंडखोर आमदार सरयू राय हे जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यावर राय यांनी 771 मतांनी आघाडी घेतली आहे.

12.56: रघुवर दास यांनी काही अडथळे स्वतःच तयार केले.

वरिष्ठ राजकीय पत्रकार निस्तुला हेब्बार यांनी बीबीसी प्रतिनिधी पंकज प्रियदर्शी यांच्याशी बोलताना सांगितले, झारखंडमध्ये भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही, रघुवर दास यांनी स्वतःच्या मार्गातच काही अडथळे तयार केले. त्यांनी 13 आमदारांची तिकिटं कापली, या सगळ्याचा एकत्रित तोटा भाजपाला झाला.

12.50: हेमंत सोरेन दोन्ही जागांवरती आघाडीवर

12.02: काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंग यांनी आपली आघाडी झारखंडमध्ये सत्ता स्थापन करेल असं सांगितलं तसेच हेमंत सोरेन आपल्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

11.20: हेमंत सोरेन यांची एका जागेवर आघाडी

10.50: काँग्रेस-राजद-झामुमोची 43 जागांवर आघाडी

10.40: निवडणूक आयोगाने 68 जागांवरील कल स्पष्ट केला असून भाजपा 22 जागांवर, झारखंड मुक्ती मोर्चा 21 जागांवर, काँग्रेस 10 जागांवर आणि राष्ट्रीय जनता दल 5 जागांवर आघाडीवर आहे.

10.19: माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून 2841 मतांनी आघाडीवर आहेत.

10.02: भाजपा नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना 342 मतांची आघाडी मिळाली आहे. ते जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

09.33: काँग्रेस आणि झामुमोला 38 जागांवर तर भाजपला 33 जागांवर आघाडी मिळाली आहे.

09.11: काँग्रेस आणि झामुमो आघाडीला 37 जागांवर आणि भाजपला 34 जागांवर आघाडी मिळाली आहे.

08.36: काँग्रेस- झामुमोला 37 जागांवर आघाडी तर भाजपला 34 जागांवर आघाडी

08.34: काँग्रेस आणि झामुमोने 36 जागांवर आघाडी घेतली असून भाजपाने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्षांना 9 जागांवर आघाडी मिळाली आहे.

08.22: काँग्रेसला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे.

08.19: काँग्रेसने 26 जागांवर तर भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.

08.14: सुरुवातीला आलेल्या कलामध्ये काँग्रेसने 18 जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपाने 9 जागांवर आघाडी घेतली आहे.

08.00: झारखंड विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात

07.14: झारखंड विधानसभेच्या 81 मतदारसंघांमधील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार

फोटो स्रोत, ANI

07.13:एक्झिट पोल्सचा अंदाज

इंडिया टुडे-My Axisचा अंदाज आहे की काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाला स्पष्ट बहुमत मिळू शकतं. तर IANS-CVoter-ABPचा अंदाज आहे की त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊ शकते.

इंडिया टुडे-My Axisनुसार भाजपला 22-32 जागा, काँग्रेस-झामुमो-राजद आघाडीला 38 ते 50 आणि इतरांना 5-7 जागा मिळू शकतात.

IANS-CVoter-ABP नुसार भाजपला 28-36 जागा तर काँग्रेस-झामुमो-राजद आघाडीला 31 ते 39 जागा मिळू शकतात.

07.12:झारखंड विधानसभा निवडणुकीविषयी थोडक्यात

भाजप विरुद्ध काँग्रेस-झामुमो-राजद आघाडी, असा थेट सामना होता.

झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत आणि बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत.

सध्या भाजपचे रघुवर दास मुख्यमंत्री आहेत. 2000 साली बिहारपासून वेगळं काढण्यात आलेल्या झारखंडचे पाच वर्ष पूर्ण करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री.

5 टप्प्यांमध्ये मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 13, दुसऱ्या 20, तिसऱ्या 17 आणि चौथ्या टप्प्यात 15 आणि पाचव्या टप्प्यात 16 जागांसाठी मतदान घेण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)