दिल्ली: किराडी भागात कपड्यांच्या गोदामाला आग, 9 जणांचा मृत्यू

दिल्ली आग

फोटो स्रोत, Ani

ईशान्य दिल्लीतील किराडी परिसरात एका गोदामाला आग लागल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 पेक्षाही जास्त लोक जखमी झाले आहेत. ही आग सोमवारी (23 डिसेंबर) पहाटे लागली.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं गोदाम एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर होतं. आगीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाने दिली आहे.

या इमारतीत आग लागल्यानंतर बचावासाठी कोणतंच उपकरण उपलब्ध नव्हतं. सर्व जखमींना जवळपासच्या रुग्णालयात तसंच संजय गांधी मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर दिल्लीत एका कारखान्यात लागलेल्या आगीमुळे 43 जणांचा मृत्यू झाला होता. राणी झांशी रोडच्या अनाज मंडी परिसरातील या कारख्यान्यात काम करणारे मजूर झोपलेले असताना ही आग लागली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)