प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादीचं राजकारण फक्त मराठ्यांभोवती फिरतं

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, @twitter Prakash ambedkar

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीच्या अंमलबजावणीविरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं मुंबईतल्या दादर परिसरात धरणं आंदोलन आयोजित केलं. काँग्रेस

CAA हा कायदा मुस्लीम विरोधी आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी लोकांना संबोधित करताना आंबेडकर म्हणाले जर तुम्हाला डिटेंशन कॅंपमध्ये जायचं नसेल तर हे (केंद्र) सरकार पाडा.

सरकारला NRC राबवायचं आहे त्यामुळेच ते राज्या-राज्यात डिटेन्शन सेंटर्स बांधत आहेत. जर तुम्हाला NRC राबवायचं नाही तर राज्यात डिटेन्शन सेंटर्स आहेत की नाही हे आधी सरकारने सांगावं असं आंबेडकर म्हणाले.

याआधी, आंबेडकर म्हणाले, "ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचं आहे."

माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं CAA आणि एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे."

"हिंदुंच्या 40 टक्के लोकांवर परिणाम होणार"

बीबीसी मराठीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे सगळं मराठा नेतृत्व आहे. ते मराठा समाजसोडून इतरांचे प्रश्न घेत नसल्याचं दिसून येतं. एनआरसीच्या माध्यमातून त्यांना हे प्रश्न हातात घेता आले असते. आता आम्हाला याचा परिणाम झालेला वर्ग वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आणावा लागला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. एनआरसी, सीएए हा मुस्लिमांविरोधतला कायदा आहे.

मुस्लिमांबरोबरच हिंदुंमधील 40 टक्के लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे. भटके विमुक्त, अनुसुचित जातीवर परिणाम होणार आहे. आरएसएसने त्यावर पांघरुण घातलं. सर्व मोर्चे मुस्लिमांबद्दल काढण्यात आले. परंतु आम्ही त्यांच्याबरोबर अनुसुचित जाती-जमांतीसाठी मोर्चा काढला आहे. हा विषय काढल्यानंतर आरएसएस आणि भाजपची भाषा थोडी बदलली आहे. पण ते फसवं आहे. हे आंदोलन चालू राहाणार आहे. या देशातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत हे सरकार चालवण्यासाठी पैसे आहेत का हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पाहिजे."

'सावरकरांना मध्ये ओढू नका'

लोकांचा लक्ष विचलित करण्यासाठी काही लोक सावरकरांना मध्येच ओढत आहेत. माझं त्यांना हे म्हणणं आहे की सावरकरांनामध्ये ओढू नका. जे लोक सावरकरांना मध्ये आणत आहेत ते शकुनीमामासारखे आहेत असं आंबेडकर म्हणाले.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

CAA आणि NRC च्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांना मोर्चाची परवानागी नाकारल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी स्पष्ट केलं. आम्ही त्यांना सभेची परवानगी दिली आहे, पण मोर्चाची नाही, असं त्यांनी सांगितलं. तर यावर प्रतिक्रिया देताना, "पोलिसांनी त्यांचं काम करावं, असं आंबेडकर म्हणाले.'

प्रकाश आंबेडकर यांनी 24 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 26 डिसेंबरच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

हे मोर्चे महाराष्ट्रभर चालणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. "राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बहुजन जनतेच्या भल्याचं कधी काम केलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नाहीत. आता उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून आहेत की नाही," आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, भाजप कार्यध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली लोकांमध्ये NRC-CAA संबंधी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात बैठक आयोजित केलेली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)