CAA: देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

देवेंद्र

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis

आपली खुर्ची वाचवण्यासाठी सावरकरांचाही अपमान सहन करायला काही लोक तयार आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

CAA च्या समर्थनात आम्ही उतरु असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काही लोक जाळपोळ आणि हिंसाचाराला चिथावणी देत आहेत असं ते म्हणाले. CAA बद्दल गैरसमज पसरवला जात आहे. हा गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करु असं फडणवीस म्हणाले.

जोपर्यंत CAA विरोधी लोक आपली तोंडं बंद करणार नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरु. CAA च्या समर्थनार्थ रॅली काढण्याची परवानगी नाकारल्यानंतर फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर सभा घेतली.

राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

याआधी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करावी. विरोधकांकडे काही कामं नाहीत त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांनी इंटरनेट सुरू ठेवलं आहे तिथं ते सोशल मीडियावरुन टीका करु शकतात असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)