प्रिया वर्मा: मध्य प्रदेशच्या या डेप्युटी कलेक्टरचा व्हीडिओ व्हायरल होतोय कारण...

प्रिया वर्मा Image copyright FACEBOOK/PRIYA VERMA

रविवार (19 जानेवारी) संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये गुलाबी रंगाचा कोट घातलेली एक महिला काही आंदोलकांना ढकलताना दिसते.

काही वेळानंतर याच महिलेनं एका आंदोलकाला पकडून थापडही लगावल्याचं या व्हीडओत पहायला मिळालं. ही महिला म्हणजे मध्य प्रदेशमधल्या राजगडच्या डेप्युटी कलेक्टर - प्रिया वर्मा.

राजगडमध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. पण तरीही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बरौरा भागामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. हा व्हीडिओ त्यादरम्यानचा आहे.

ANI या वृत्तसंस्थेनेही हा व्हीडिओ प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये एका ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होताना दिसतीये. प्रिया वर्मा तिथेच उपस्थित होत्या. या दरम्यान कोणीतरी त्यांचे केसही ओढले.

इंदौरजवळच्या मांगलिया गावातल्या प्रिया वर्मा वयाच्या 21व्या वर्षी डीएसपी झाल्या.

प्रिया वर्मा 2014 साली मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. भैरवगड तुरुंगाच्या जेलर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. यानंतर 2015 मध्ये त्या डीएसपी (उप-अधीक्षक) झाल्या.

2017 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि राज्यात चौथा क्रमांक पटकावत त्या डेप्युटी कलेक्टर झाल्या.

कलेक्टरचाही व्हीडिओ व्हायरल

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये प्रिया वर्मा यांच्याशिवाय आणखी एक महिला आंदोलकांसोबत पहायला मिळते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

ही महिला म्हणजे राजगडच्या कलेक्टर - निधी निवेदिता. त्यांचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलं, "कलेक्टर मॅडम, कायद्याच्या नेमक्या कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करून तुम्हाला शांततापूर्वक निदर्शनं करणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्याचे आणि फरफटत नेण्याचे अधिकार मिळाले हे सांगाल का?"

या सगळ्या प्रकरणानंतर डेप्युटी कलेक्टर प्रिया वर्माचं नाव ट्विटरवर ट्रेंड होत होतं.

या कारवाईनंतर काही लोकांनी राज्यातल्या कमलनाथ सरकारवर टीका केली तर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उचलण्यात आलेली ही पावलं योग्य होती, असं काही जणांचं म्हणणं आहे.

Image copyright FACEBOOK

राज्य सरकारकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं, की हा प्रजासत्ताकातील सर्वांत 'काळा दिवस' आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या

कोरोना व्हायरस : एकाचवेळी लाईट बंद केल्यास ग्रीड बिघडू शकते- नितीन राऊत

टाटांनी केली 'ताज'मध्ये डॉक्टरांच्या राहाण्याची सोय

तबलीगीचे लोक पोलिसांवर खरंच थुंकले का?

'अवकाळीतून जीवापाड वाचवलेली बाग आता स्वतःच्या हाताने तोडतोय'

कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

लॉकडाऊनच्या दिवसांत पाणबुड्यांकडून काय शिकण्यासारखं आहे?

कोरोना संबंधी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यास तुरुंगात जावं लागणार?

मुंबई लॉकडाऊनमुळे भिकारी आणि बेघरांच्या रोजच्या जगण्याचं काय होणार?

'जिवंत राहायचंय बस, पुढचं पुढे पाहता येईल,' लॉकडाऊनमध्ये भरडलेल्या सेक्स वर्कर्सची कहाणी