महिलांनी, महिलांसाठी चालवलेलं पोस्ट ऑफिस

महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांना योग्य ठिकाणी पैसा गुंतवता यावा यासाठी भारतीय टपाल खात्यानं माहिम बाजार इथे महिला पोस्ट ऑफिस सुरू केलं आहे.

या पोस्ट ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी महिलाच आहे. 25 जानेवारीला हे पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलं आहे.

इथल्या ग्राहक चित्रा कुलकर्णी म्हणतात, मी जवळपास 20 वर्षांपासून या पोस्ट ऑफिसमध्ये येत आहे. बिल भरायला, सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे भरायला इथे यावं लागतं. इथला स्टाफ खूपच हेल्पफुल आहे. आता महिला स्टाफ असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो. इथे दररोज खूप महिला येतात. त्यांना येथील स्टाफ चांगल्या प्रकारे मदत करतो."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)