मुंबईत झालेल्या मिटिंगची माहिती केंद्राला कुणी दिली – शरद पवार

शरद पवार

फोटो स्रोत, ANI

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलावलेल्या बैठकीची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला कुणी दिली, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

"या प्रकरणातल्या पोलिसांच्या भूमिकेची चौकशी होणार होती, त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती केंद्राला दिली का," असाही सवाल पवार यांनी केला आहे.

मला खात्री आहे की अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी ही माहिती केंद्रात दिलेली नाही, असं ते पुढे बोलले आहेत.

मागच्या सरकारनं या प्रकरणी केलेल्या सत्तेच्या गैरवापराची एसआयटी मार्फत चौकशी करवी असंही त्यांनी म्हटलंय.

सेक्शन 10चा अधिकार वापरून राज्य सरकार चौकशी करू शकतं. तसंच राज्य सरकारला समांतर चौकशीचा अधिकार आहे, असंही त्यांनी सूचित केलंय.

पवार यांनी या संदर्भातलं त्याचं म्हणणं सरकारला लेखी कळवलं आहे. तपास झाल्यास तुरुंगात असलेल्या लोकांबाबतच सत्य समोर येईल असा दावासुद्धा पवारांनी केला आहे.

दवेंद्र फडणवीस यांच्या 'हिम्मत असेल तर निवडणुका घ्या' या वक्तव्यावर 'राज्यातच कशाला संपूर्ण देशातच निवडणुका घ्या,' असं पवार यांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)