'अपर्णा रामतीर्थकर, तुम्हाला बाप नावाच्या पुरुषाचं काळीज कधीच कळणार नाही'

अपर्णा रामतीर्थकर Image copyright Aparna ramtirthkar/facebook

बीबीसी मराठीनं व्याखात्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या महिलांविषयक वक्तव्यांची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली. रामतीर्थकर यांच्या विचारांवर काहींनी तीव्र भाषेत तोंडसुख घेतलं.

बीबीसी मराठीने अपर्णा रामतीर्थकर यांच्याविषयीची प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक

अपर्णा रामतीर्थकर फक्त महिलांनाच का देताहेत उपदेशाचे डोस?

ही बातमी वाचून सोशल मीडियावर अनेक मुली, महिला उत्स्फुर्तपणे व्यक्त झाल्या. अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. काहींनी रामतीर्थकर बाईंची बाजू घेतली आहे. त्यांचं म्हणणं योग्यच आहे असं काहींना वाटतं.

कल्पना सानप इंगळे यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात किमान एक तरी रामतीर्थकर बाई असतेच. कधी शेजारी ,कधी कामाच्या ठिकाणी, कधी ओळख पाळख नसलेली, पण तरी नजरेनं देखील टोमणे मारणारी असते. क्वचित आपल्या मनात सुद्धा ! इतर मुलींना कधी आपण मनातून जरी उगाच नावे ठेवली, तरी ही मनातील रामतीर्थकर बाई मोठी होते.

"आपण काय कपडे घालतो? काय करतो? कुणाशी बोलतो, आपले मित्र मैत्रिणी कोण आणि किती आहेत ? आपले आपल्या फॅमिली बरोबर संबंध कसे आहे? आपले लग्नानंतरचं आयुष्य कसं चालू आहे? ह्या एक ना अनेक गोष्टीत त्या रामतीर्थकर बाईंना भयंकर इंटरेस्ट असतो. स्त्री ही एक स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती असू शकते, तिला भावना आहेत, ती चूका करू शकते, त्या सुधारू ही शकते, ती आपली काळजी घेऊ शकते, ह्या गोष्टींवर रामतीर्थकर बाईंना अजिबात विश्वास नाही."

Image copyright facebook

"समाजात एक वर्ग असा असतो, ज्याला कुजट विचार म्हणजे खरंच संस्कृती आणि कुटुंब टिकवण्यासाठी गरजेचे वाटतात किंवा ते गरजेचे आहेत हे त्यांच्यावर बिंबवलं जातं आणि मग त्यांचा त्या वर्गातल्या स्त्रियांवर ते विचार लादण्याची सक्ती सुरू होते," अशी फेसबुक पोस्ट स्मिता गायकवाड यांनी केली आहे.

Image copyright facebook

शीलभद्र शेळके यांनी म्हटलंय, "घरंदाज मराठी कुटुंबात हेच शिकवलं जातं. त्या वेगळं काय सांगत आहेत. आता या व्यवहारिक गोष्टी सांगणं गुन्हा आहे का? ज्यांना पटतं त्यांनी अनुसरण करावं, पटत नसेल तर करू नये."

Image copyright facebook

डॉ. अश्विनी अहिरे यांनी लिहिलंय, "बाई तुमच्या पिढीत काय करत होतात, त्याचं ज्ञान आमच्यासमोर पाजळू नका. आमच्या पिढीतल्या मुली अंतराळात गेल्यात. स्त्री डॉक्टर कडे जर पुरुष पेशंट emergency मध्ये आला, तर काय त्याला बिना हात न लावताच तपासायचे कोणती पद्धत असेल ते ती सांगा. बाई जग कुठे चाललंय आणि तुम्ही परत कुठल्या दरीत घेऊन जाताय? बापाचं प्रेम आणि मुलगी त्याच्यासाठी त्याच्या काळजापेक्षा जास्त प्रिय असते."

Image copyright facebook

कैलास पाटील यांनी म्हटलंय, "महाराष्ट्रात घटस्फोटाच्या सर्वात जास्त केस कोर्टाबाहेर सोडवणाऱ्या विदुषी आहेत वकील अपर्णा ताई रामतीर्थकर. यांनी कोणाचाच घटस्फोट न घेवून देता वर वधु दोन्ही बाजूना योग्य सल्ला देवून मोडणारी कुटुंब सावरली आहेत. मुलींच्या सुरक्षेपायी दोन गोष्टी समजवल्या तर योग्यच आहे."

Image copyright facebook

वडिलांसोबतचे फोटो केले पोस्ट

सुषमा एस. यांनी वडिलांसोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट करत लिहिलंय, "अपर्णा रामतीर्थकर यांना बाप नावाच्या पुरुषाचं काळीज कधीच कळणार नाही."

Image copyright facebook

अमोल गायकवाड यांनीही त्यांच्या मुलीसोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय, "अपर्णा रामतीर्थकर या बाईचं बाप-लेकीचं वक्तव्य ऐकल्यानंतर मी माझ्यातला पुरुष शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी फक्त बाप आणि बापच भेटला."

Image copyright facebook

सुचिकांत वनारसे यांनी म्हटलंय, "अपर्णा रामतीर्थकर यांचे बरेच व्हिडीओ पाहिल्यावर, ही व्यक्ती घरातल्या म्हाताऱ्या आजीबाईंपेक्षा अजिबात वेगळी नाही, चारचौघी घराच्या अंगणात ज्या गप्पा मारतात त्यापेक्षा फार वेगळं ही व्यक्ती विचार करत नाही असं वाटतं. बाजारात एकाच विकाराला अनेक औषधपद्धतींमध्ये शेकडो औषधे असतात, प्रत्येक औषध रुग्णाला लागू होईलच असे नाही. अपर्णा रामतीर्थकर यांसारखे लोक म्हणजे अश्याच विविध औषधांपैकी एक आहेत, पण अतिप्रमाणात घेतली तर विष आहेत एवढं मात्र लक्षात असायला हवं. आपल्याला आवडलं, पटलं तर डोस घ्यावेत नाहीतर सोडून द्यावं, कारण समाजातल्या प्रॉब्लेम्सचं त्यांचं अंडरस्टँडिंग आणि त्यावरील उपाय हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, फक्त हे लोक काही बेकायदेशीर सल्ले देत नाहीत ना इतकंच तपासावं. त्या स्वतः वकील असल्याने असं काही करणार नाहीत याची खात्री वाटते."

Image copyright facebook

शंतनू लटपटे यांनी आमच्याकडे थरथरत्या हाताने चहा दिला जातो, अशा आशयाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.

Image copyright facebook

सोशल मीडियावर मीम्स

या प्रतिक्रियांबरोबरच सोशल मीडियावर अनेक मीम्स शेयर केले जात आहेत.

Image copyright facebook
Image copyright facebook

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या