डोनाल्ड ट्रंप आणि मेलानिया यांना पडली ताजमहालची भुरळ

ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आग्र्यात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं.

ताजमहाल येथे असलेल्या व्हिजिटर्स बुकमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी अभिप्राय लिहिला. ताजमहाल येथे पोहोचल्यावर डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी गाईडकडून ताजमहालची माहिती घेतली. ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंप आणि त्यांचे पती जेरेड कुश्नर यांनीही ताजमहाल पाहिला.

फोटो स्रोत, Ani

जगातल्या सगळ्यांत मोठ्या अशा मोटेरा क्रिकेट स्टेडियमध्ये आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

पंतप्रधा नरेंद्र मोदी म्हणाले, "हा ऐतिहासिक क्षण आहे. आपण संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार आहोत. पाच महिन्यांपूर्वी मी अमेरिका दौऱ्याची सुरुवात ह्यूस्टन इथल्या हाऊडी मोदी दौऱ्याने केली. माझे मित्र, डोनाल्ड ट्रंप यांनी ऐतिहासिक भारत दौऱ्याची सुरुवात नमस्ते ट्रंप कार्यक्रमाने केली".

ते पुढे म्हणाले, "जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाकडून तुमचं स्वागत. तुम्ही गुजरातच्या भूमीवर आहात, भारत तुमचं उत्साहाने स्वागत करत आहे. भारत-अमेरिका हे केवळ भागीदार देश नाहीत, ते त्याहून घनिष्ठ ऋणानुबंध आहेत".

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं भारतात आगमन झालं आहे. ट्रंप, त्यांचे कुटुंबीय आणि ताफ्याला घेऊन येणारं विमान अहमदाबादमध्ये दाखल झालं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन येणारं एअरफोर्स1 हे विमान दाखल झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

चरखा आणि सूतकताई यांच्याविषयी ट्रंप दांपत्य यांना समजून देताना नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रंप पतीपत्नींसह साबरमती आश्रमात गेले. नरेंद्र मोदींनी ट्रंप दांपत्याला सूतकताईबद्दल माहिती दिली.

ट्रंप यांचा दौरा लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत ट्रंप यांचं स्वागत केलं.

फोटो स्रोत, PM Twitter

फोटो कॅप्शन,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांची भेट झाली तो क्षण

डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतभेटीवर येत आहेत. 36 तासांच्या भारतभेटीत ते अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली अशा तीन शहरांना भेट देणार आहेत. भारतात येणारे ते अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष असतील.

फोटो कॅप्शन,

डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागताची तयारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियम किंवा मोटेरा स्टेडियमवर ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जाहीर सभा घेतील.

दरम्यान अमेरिकेहून भारतासाठी रवाना झालेल्या ट्रंप यांनी प्रवासादरम्यान हिंदीतून ट्वीट केलं आहे.

"आम्ही भारतात येण्यासाठी सज्ज झालो आहोत. प्रवासात आहोत, काही तासांतच भेटूया," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रंप, मेलानिया ट्रंप आणि अन्य पाहुण्यांसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदाबाद शहराला सैन्याच्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

डोनाल्ड ट्रंप गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीत येणार असले तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ट्रंप यांच्या दौऱ्याची भीती का वाटत आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

भारत-अमेरिका कराराची महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांना भीती?

डोनाल्ड ट्रंप भारत दौऱ्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ट्रंप भारतासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांच्या प्रशासनाने ट्रंप यांच्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील हे स्पष्ट केलं.

डोनाल्ड ट्रंप प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालला भेट देणार आहेत. यासाठी आग्रा शहरात अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

विदेशी राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघात किंवा गुजरात राज्यात घेऊन जातात असा आरोप केला जातो. खरंच तसं आहे का याचा घेतलेला आढावा.

फोटो कॅप्शन,

ट्रंप यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

यंदाच्या वर्षीच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यादृष्टीने ट्रंप यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी'ला उत्तर म्हणजे अहमदाबादमधील 'नमस्ते ट्रंप' रॅली आहे, अशी चर्चा आहे.

मोटेरा स्टेडियममध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

फोटो कॅप्शन,

नमस्ते ट्रंप कार्यक्रमासाठी तय्यार झालेले कलाकार

एक लाखाहून अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये ट्रंप यांच्या स्वागताचा कार्यक्रम होणार आहे.

कसं आहे हे मोटेरो स्टेडियम

व्यापारी करारावरून अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. या दौऱ्यात त्यासंदर्भात काही चर्चा होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रंप भारतात नेमकं कशासाठी येत आहेत? जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची महाभियोगातून मुक्तता करण्यात आली आहे. सिनेटच्या निर्णयानंतर दोन आठवड्यांची ही सुनावणी संपुष्टात आली.

ट्रंप यांच्यावर प्रदीर्घ काळ महाभियोगाची प्रक्रिया चालली. येत्या काही महिन्यात ट्रंप राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीला सामोरे जातील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्कमधल्या इकॉनॉमी क्लबमध्ये 12 नोव्हेंबर रोजी हवामान बदलाबद्दल बोलताना भारत, रशिया आणि चीन आदी देशांवर निशाणा साधला.

अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल्- बगदादी मारला जाणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मोठा विजय मानला जायला हवा होता.

हे वाचलंत का?