नरेंद्र मोदींचा सोशल संन्यास नाही तर प्रेरणादायी महिलांकडे देणार अकाऊंट्सचा ताबा

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी ट्वीट करून महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया अकाउंट्सचा ताबा एका दिवसासाठी प्रेरणा देणाऱ्या महिलांकडे देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी अशा महिलांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसंच लोकांना त्यासाठी नावं सुचवण्यासही त्यांनी सांगितलं आहे.

#SheInspiresUs वापरून लोक नावं सुचवू शकतात. तसंच ज्या महिलांना एक दिवसासाठी नरेंद्र मोदींचं अकाऊंट वापरायची संधी हवी असेल त्यांनासुद्धा #SheInspiresUs वापरून त्यांची माहिती किंवा व्हीडिओ पोस्ट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नेटिझन्समध्ये रंगली होती चर्चा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार मनात येऊन गेल्याचं ट्वीट केलं आणि सोशल मीडियावर नेटिझन्सनी एकच धुमाकूळ घातला होता.

कुणी मोदींनी सोशल मीडिया सोडू नये म्हणून विनंती करू लागलं, तर कुणी मोदींच्या ट्वीटची खिल्ली उडवू लागलं. अनेकांनी तर मोदींचं ट्वीट रिट्वीट करत मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या.

ट्विटरवर मोदींच्या ट्वीटशी संबंधित 'No Sir' असे दोन शब्द ट्रेंड होऊ लागलेत. मोदींना सोशल मीडिया सोडू नये, अशी विनंती करणाऱ्या अनेकांनी 'No Sir' म्हणत हे शब्द ट्रेंड केलेत.

मोदींच्या ट्वीटला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उत्तर दिलंय. त्यांचं ट्वीटही व्हायरल होऊ लागलंय.

राहुल गांधी म्हणालेत, 'सोशल मीडिया नव्हे, द्वेष सोडा'

फोटो स्रोत, Twitter

जसं मोदींच्या ट्वीटची खिल्ली उडवली गेलीय, टीका केली गेलीय, त्याचप्रमाणं मोदींबद्दल आदर व्यक्त करत सोशल मीडिया न सोडण्याची विनंतीही करण्यात आलीय.

उत्तर प्रदेशातील कानपूरचे भाजप खासदार सत्यदेव पचौरी यांनी मोदींना उत्तर देताना ट्विटरवरील अफवा, अपशब्दांबद्दल चिंता व्यक्त केलीय.

फोटो स्रोत, Twitter

श्वेता नामक युजरनं मोदींच्या ट्वीटवर काहीशी मजेशीर प्रतिक्रिया दिलीय.

फोटो स्रोत, Twitter

ट्विटरवर 'हिस्ट्री ऑफ इंडिया' नावाचं अकाऊंट विविध चालू घडामोडींवर उपहासात्मक पद्धतीनं व्यक्त होतं असतं. मोदींच्या ट्वीटरवरही या अकाऊंटवरून दिलेली प्रतिक्रिया चर्चेचं केंद्र बनलीय.

फोटो स्रोत, Twitter

फैजल नावाच्या स्टोरीटेलरनं केलेलं मोदींच्या ट्वीटला रिट्वीट करत विचारलेला प्रश्न काश्मीरशी संबंधित आहे.

फोटो स्रोत, Twitter

'भाजप समर्थक' अशी ओळख सांगणाऱ्या अंकित जैन यांनी 'कुछ कुछ होता है' सिनेमातील 'तुस्सी ना जाओ' हा प्रसिद्ध संवाद म्हणणाऱ्या चिमुकल्याचा फोटो ट्वीट केलाय.

फोटो स्रोत, Twitter

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्वीट करत मोदींना समर्थन दिलंय. त्या म्हणतात, "कधी कधी लहान निर्णय सुद्धा आयुष्य बदलू शकतात. मीही माझ्या नेत्याचं अनुकरण करेन."

फोटो स्रोत, Twitter

मोदींच्या मूळ ट्वीटखालीही अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सोशल मीडियावर मोदींचं हे ट्वीट सध्या चर्चेचं केंद्र बनलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)