दिलली दंगलः ताहिर हुसैन यांना अटक

ताहिर हुसैन

फोटो स्रोत, Tahir hussain/FB

आप चे नगरसेवक ताहिर हुसैन यांना अटक करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ताहिर हुसैन यांनी त्यांचे वकील मुकेश कालिया यांच्यामार्फत गुरुवारी दिल्लीतील राऊज अॅवेन्यू कोर्टात अॅडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट विशाल पहुजा यांच्यासमोर शरणागतीचा अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी ताहिर यांना अटक केली.

आपने ही त्यांना निलंबित केलं आहे.

तत्पुर्वी ANI या वृत्तसंस्थेच्या मते मंगळवारी पत्रकारांशी बातचीत करताना दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एक सिंगला म्हणाले, "24-25 फेब्रुवारीलाच काही लोकांनी आम्हाला सांगितलं की एक नगरसेवक अडकला आहे आणि आम्हाला असुरक्षित वाटतंय. त्यानंतर पोलिसांनी जाऊन त्यांना वाचवलं."

तर ताहिर हुसैन म्हणत राहिले की, ते स्वत:च हिंसाचारात अडकले होते. दंगलखोरांनी त्यांच्या घराला घेराव घातला होता आणि मदतीसाठी त्यांनी पोलिसांना अनेकदा फोन केला होता.

अंकित शर्मा हत्या प्रकरण

ताहिर हुसैन यांच्या मते पोलीसच त्यांच्या घरी आले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांच्या घरी हिंसाचार होतोय आणि ते पोलिसांना मदत मागत आहेत.

मी दंगल रोखण्याचा प्रयत्न करत होतो असं ते बीबीसीशी बोलताना म्हणाले होते.

त्यानंतर एक व्हीडिओ समोर आला. त्यात त्यांच्या घराच्या छतावर दगड विटा आणि पेट्रोल बाँब दिसले होते.

फोटो स्रोत, ANI

त्यानंतर पोलिसांनी अंकित शर्माच्या हत्येचा खटला त्यांच्यावर दाखल केला होता. ताहिर हुसैन तेव्हापासून बेपत्ता आहे आणि त्यांची अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तर दिल्ली पोलीस सांगतात., ते अजुनही त्यांचा शोध घेत आहेत.

24-26 फेब्रुवारीला दिल्लीत हिंसाचार झाला. त्यात 40 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 200 लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचलंत का?