पाहा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण: बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर #ISWOTY

ही सामग्री यापुढे उपलब्ध नाही
पाहा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण: बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर #ISWOTY

पाहा दिल्लीमध्ये होत असलेल्या बीबीसी बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण.

बीबीसीतर्फे पहिल्यांदाच देण्यात येणाऱ्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019' या पुरस्कारासाठीची नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत.

बीबीसीतर्फे इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात येत आहे. क्रीडाक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याऱ्या महिला खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर पुरकारासाठी ही पाच नामांकनं आहेत: दुती चंद - अॅथलेटिक्स, मानसी जोशी - पॅरा बॅडमिंटन, मेरी कोम - बॉक्सिंग, पी. व्ही. सिंधू - बॅडमिंटन, विनेश फोगाट -फ्रिस्टाईल रेसलिंग.

या पुरस्कारासाठी बीबीसीतर्फे मान्यवर परीक्षण मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात क्रीडा क्षेत्रातील पत्रकार आणि तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ऑनलाइन मतदान करून आपली आवडती खेळाडू निवडण्याची संधी देखील चाहत्यांना देण्यात आली होती.

महिला खेळाडूंबद्दल भारतीयांना काय वाटतं?

या पुरस्काराचं औचित्य साधून बीबीसीने देशातील 14 राज्यांमध्ये एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात एकूण 10,181 लोकांनी सहभाग घेतला. त्या आधारावर बीबीसीने अभ्यास प्रसिद्ध केला आहे.

किती जणांना खेळामध्ये रस आहे, महिला खेळाडूंबद्दल भारतीयांना काय वाटतं अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि रंजक गोष्टी या अभ्यासातून समोर आल्या आहेत. या संशोधनसंदर्भात अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)