कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images / Peter Zelei Images

राज्यात शनिवारी (10 एप्रिल) 55,411 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 5,36,682 वर गेली आहे.

शनिवारच्या दिवसात मुंबईत 9,330, पुणे महापालिका क्षेत्रात 4,925 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 3,696 रुग्ण आढळले. तर नाशिक महापालिका क्षेत्रात 1,944 रुग्ण आढळले.

राज्यात शनिवारी (10 एप्रिल) 53,005 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्याचा रिकव्हरी रेट घसरण होत 82.18% वर आलेला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात शनिवारी 309 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आजपर्यंत राज्यात 57,638 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्हा - महापालिका निहाय दैनंदिन रुग्णसंख्या

महाराष्ट्रातल्या जिल्हयांतली रुग्णसंख्या

महाराष्ट्रातील आकडेवारी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)