कोरोना व्हायरस : शरद पवार म्हणतात, 'केंद्र सरकारनं शेतीसाठी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नाही

लीड Image copyright NCP/FACEBOOK

केंद्र सरकारनं शेतीसाठी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी बोलताना व्यक्त केलं.

शरद पवारांनी मांडलेले प्रमुख मुद्दे –

1. कोरोनाचं संकट गंभीर आहे. सरकारनं गंभीर पावलं टाकली पाहिजेत.

2. सरकार करत असलेल्या सूचना पाळायला हव्यात. सरकारला सहकार्य करायला हवं. घरात थांबा, हात धुवा, स्वच्छता पाळा, ही प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळली पाहिजे. नाहीतर त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल.

3. शेती, उद्योग, कारखानदारी, बेरोजगारी या सगळ्या क्षेत्रावर कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम होणार आहे.

4. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज शेतीसाठी पुरेसं आहे असं वाटत नाही. कारण पीककर्जाची परतफेड होईल, असं वाटत नाही. कारण आजही अनेक पीकं शेतातच आहेत. द्राक्ष, संत्रा बागा-शेतात आहेत. त्यांची तोड कशी करायची, ते बाजारात कसं आणायचे, हे प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे या कामासाठी त्यानं जे कर्ज काढलं, त्यासाठी ४ ते ५ वर्षं हप्ते दिले पाहिजेत. आणि पहिलं वर्षं व्याजामध्ये पूर्ण सूट दिली पाहिजे.

5. धान्य मोफत देण्याचं मी स्वागत करतो, पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काय असेल, याचाही विचार सरकारनं करावा.

6. सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणखी काही निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनं घ्यावेत.

7. राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचं एक महिन्याचं वेतन सहाय्यता निधीत देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. अजून जे काही करता येईल, त्यात आम्ही सहकार्य करू.

8. पोलिसांनी सुरुवातीला काही कठोर भूमिका घ्यावी लागली, ती थोडे दिवस सहन केली पाहिजे, त्यामुळे आता लोकांच्या वर्तणुकीत फरक आला आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे, हे लक्षात घेऊन पोलिसांनी आपलं धोरण बदलायला हवं.

9. लगेच नवीन कोरोना हॉस्पिटल उघडणं शक्य होणार नाही. राज्यातील मेडिकल कॉलेजेसची कशाप्रकारे मदत घेता येईल, याचीच चाचपणी केली जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

मोठ्या बातम्या