उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करा, मंत्रिमंडळाची शिफारस

फोटो स्रोत, OfficeOfUT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करा, अशी शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीतून करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे सध्या राज्य विधीमंडळाच्या दोन्हीपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात कुठल्यातरी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं बंधनकारक असतं.
विधान परिषदेत सध्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या 2 जागा रिक्त आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी राज्यात सत्तापेच निर्माण झाला असता.
उद्धव ठाकरे सहा महिन्यात दोन्हीपैकी कुठल्याही एका सभागृहाचे सदस्य झाले नाहीत तर त्यांना मंत्रिमंडळाचा राजिनामा द्यावा लागेल. हा पेच टाळण्यासाठीच आजचा निर्णय घेण्यात आल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
ज्या सदस्याची शिफारस करायची आहे, त्याच्याच अध्यक्षेत बैठक होऊ नये हा संकेत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची आमदारकीसाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)