भारत चीन सीमावाद: 'गलवान खोऱ्यातल्या चकमकीत मी माझा भाऊ नाही तर प्रेरणास्रोत गमवला'

पलानी

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी चकमक झाली. त्यात भारतीय सैन्याचे तीन सैनिक मृत्यूमुखी पडले. त्यापैकी एक पलानी देखील होते. बाकीच्या दोन जणांची ओळख भारतीय सैन्याने सांगितलेली नाही.

बीबीसी तामिळने पलानी यांचे भाऊ इथयाक्कानी यांच्यीशी संपर्क साधला. इथयाक्कानी देखील भारतीय लष्करातच आहेत. ते म्हणाले, "माझा मोठा भाऊ माझ्यासाठी प्रेरणास्थान होता. गेल्या 22 वर्षांपासून ते भारतीय सैन्यात काम करत होते."

पलानी हे तामिळनाडूतील रामनाथपूरम जिल्ह्यातले होते. त्यांचं वय 40 वर्षं होतं.

पलानी यांचे भाऊ इथायाक्कानी हे देखील भारतीय सैन्यातच आहेत. इथायाक्कानी यांचं पोस्टिंग राजस्थानमध्ये आहे. आपल्या भावाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर ते तामिळनाडूला निघाले आहेत.

फोटो कॅप्शन,

पलानी

पलानी यांच्या निधनावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे.

काल मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की लडाख भागात झालेल्या चकमकीत माझ्या भावाचं निधन झालं. आता त्याच्या अंत्यविधीसाठी मी तामिळनाडूला निघालो आहे असं इथयाक्कानी यांनी बीबीसी तामिळला सांगितलं.

माझ्या मोठ्या भावाशी मी अवघ्या दहा दिवसांपूर्वी बोललो होतो असं इथयाक्कानी यांनी बीबीसीला सांगितलं. माझ्या भावाकडून प्रेरणा घेऊनच मी लष्करात आलो. त्याच्या निधनाने आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. माझी वहिनी आणि दोन पुतणे यांच्यावर किती मोठा आधात झाला असेल याची तर मला कल्पनाच करता येत नाहीये असं इथयाक्कानी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)