MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आली, सुधारित वेळापत्रक लवकरच येणार

परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

कोव्हिड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यसेवा पूर्व परीक्षा यावर्षी 5 एप्रिलला नियोजित होती. त्यानंतर ती 26 एप्रिलला करण्यात आली आणि त्यानंतर ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

मग राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 ला होणार आहे. PSI, STI आणि ASO या अराजपात्रित पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 ला तर अभियांत्रिकी सेवेची पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला होईल असं सांगण्यात आलं होतं.

आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

या कोणत्याही परीक्षांच्या मुख्य परीक्षांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)