उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री- भाजपची टीका #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ShivSena/facebook

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे

विविध वृत्तपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री- भाजपची टीका

राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न जाणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. राज्यात कोरोनाचं महासंकट असतानाही ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. जनतेचा आक्रोश त्यांच्या कानी गेला नाही अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत. सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य कारभार चालिवता येत नाही, यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे व उद्रेक झाला आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

एवढे महिने राज्य सांभाळूनही राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा यायला तयार नाहीत. मागे कोविड संदर्भात मंत्रालयात बैठक झाली, आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

2. राज्यातील 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यासंबंधी चर्चा सुरु होती. गणेशोत्सव पार पडेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, अशी भूमिका पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्याने राज्य सरकारने बदल्यांसाठी ५ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर गेल्या होत्या. मात्र आता गणेशोत्सव संपल्यानंतर बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. लोकसत्ताने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राज्य सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यासंबंधी चर्चा सुरु होती. गणेशोत्सव पार पडेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, अशी भूमिका पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्याने राज्य सरकारने बदल्यांसाठी 5 सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर गेल्या होत्या. मात्र आता गणेशोत्सव संपल्यानंतर बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यासंबंधी चर्चा सुरु होती. गणेशोत्सव पार पडेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, अशी भूमिका पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्याने राज्य सरकारने बदल्यांसाठी ५ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर गेल्या होत्या. मात्र आता गणेशोत्सव संपल्यानंतर बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे.

3. मशिदीत नमाज अदा करण्यापूर्वी इम्तियाज जलील यांना अटक

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील बुधवारी औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते औरंगाबादेतील शहागंज मशिदीत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते कार्यालयापासून चालत रवाना झाले असताना वाटेत पोलिसांनी अडवत त्यांना ताब्यात घेतलं. टीव्ही 9 मराठीने यासंदर्भात बातमी दिली आहे.

इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.

4. महाआघाडी सरकार पडेल ही भाबडी आशा- खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. महाआघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांना दिला आहे. नेटवर्क18ने ही बातमी दिली आहे.

10-15 वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे.

5. कोरोनाच्या आडून लोकशाहीची हत्या, संसदेत प्रश्नोत्तराचा तास रद्द

कोरोना, चीनसोबतचा तणाव, पीएम केअर फंड, जीडीपीसह अनेक मुद्यांवर अडचणीत येण्याची भीती वाटत असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत संसदेत होणारा प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. लोकसभा व राज्यसभा सचिवालयाने एका पत्रकाद्वारे हे कळवल्यानंतर विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रश्न विचारण्याचा खासदारांचा घटनात्मक अधिकारच मोदी सरकारने हिरावून घेतल्याची टीका होत आहे. कोरोनाच्या आडून ही लोकशाहीची हत्याच आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. सामनाने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

आतापर्यंत कोणत्याच सरकारला न जमलेली गोष्ट मोदी सरकारने करून दाखवली आहे. कोरोनाचं संकट असताना संसदेचं सत्र होत आहे परंतु कोरोनाचा धोका असल्याने केवळ प्रश्नोत्तराचा त्रास रद्द करण्यात आला आहे. जीडीपी ऋणकोत नेण्याचा पराक्रम मोदी सरकारने केला.

पीएम केअर नावाने सुरू केलेल्या फंडाचा हिशोब देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. चीनबरोबर संघर्षासंदर्भात दिशाभूल करण्यात आली आहे. विरोधकांनी कोंडीत पकडू नये यासाठी कोरोनाचं कारण देत प्रश्नोत्तराचा तासच रद्द करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. संसदेला नोटीस बोर्डापुरती आणि बहुमताला रबर स्टॅंपसारखी वापरण्याची नीती आहे असं काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटलं आहे. कोरोनाआडून मोदी सरकार लोकशाहीचा खून करत आहे अशी जळजळीत टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)