नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटर अकाउंट हॅक

फोटो स्रोत, Getty Images
मोदींच्या काळात आर्थिक विकासाचा दर कमी झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटवर बुधवारी हॅकर्सनी आक्रमण केलं. हॅकर्सनी मोदी यांच्या वेबसाईटचं ट्वीटर अकाऊंट हॅक केलं. त्यानंतर कोव्हिड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून थेट बिटकॉईनची मागणी केली. मात्र काही वेळातच ही ट्वीट डिलिट करण्यात आली.
मोदींच्या वेबसाईटच्या ट्वीटर अकाऊंटवर एक मेसेज लिहिण्यात आला होती. "मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कोव्हिड19 साठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडासाठी दान करा".
एकापाठोपाठ एक ट्वीट करण्यात आली. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये असं म्हटलं होतं की हे अकाऊंट जॉन विकने हॅक केलं आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेला नाही असंही त्यात लिहिलं होतं. हो दोन्ही ट्वीट डिलिट करण्यात आली.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
पंतप्रधान मोदींच्या वेबसाईट ट्वीटर अकाऊंटचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्वीटरने गुरुवारी याबाबत माहिती दिली असून हे अकाऊंट हॅक झाल्याचं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं.
मोदींच्या वेबसाईटचं अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी आवश्यक सुरक्षायोजना अमलांत आणण्यात आली आहे.
देशात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया हँडल्स हॅक करण्यापर्यंत हॅकर्सची मजल गेली आहे.
फोटो स्रोत, Twitter
आता थेट देशाच्या पंतप्रधानांच्या वेबसाईटच्या ट्वीटरला धक्का पोहोचला आहे. मोदींच्या वेबसाईटचं ट्वीटर अकाऊंट हॅक करून हॅकरने बिटकॉईनची मागणी केली. बिटकॉईन हा व्हर्च्युअल चलनाचा भाग आहे.
2009 मध्ये याची सुरुवात झाली. डॉलर, रुपये तसंच पौंडसारख्या अन्य चलनांमध्येदेखील हे वापरता येतं.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणे जागतिक स्तरावरील मोठ्या नेत्यांची अकाऊंट हॅक होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफ यांनाही हॅकर्सचा फटका बसला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार जो बायडेन यांचं अकाऊंटही हॅक करण्यात आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)