पब्जी बंद झाल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

पबजी

फोटो स्रोत, Pubg

बुधवारी केंद्र सरकारने चिनी बनावटीच्या 118 अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यापैकी प्रमुख नाव होतं पब्जी हा गेम. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असा हा गेम. मुलामुलींचा अभ्यासाचा वेळ वाया घालवणारा खेळ अशी पालकांमध्ये त्याची प्रतिमा होती.

पब्जीवर बंदीची कारवाई झाल्यामुळे देशभरातले पालक आनंदले असतील अशा आशयाचे मीम्स सोशल मीडियावर फिरू लागले. त्याचवेळी दिवसदिवस पब्जी खेळणारे काय मनस्थितीत असतील हे दाखवणारे मीम्सही जोरदार फिरू लागले. 24 तासाहून जास्त वेळ या मीम्सचा महापूर लोटला. नेटिझन्सच्या प्रतिभेला धुमारे फुटल्याचं लक्षण असणारे काही मीम्स आणि प्रतिक्रिया तुमच्यासाठी.

बीबीसी मराठीने केलेल्या बातमीवर वाचक प्रफुल्ल राऊत म्हणतात, छान झालं, तरुण पिढी आता कामाला लागेल, नाहीतर हातात 24 तास मोबाईल असतो.

सरकारने एकदम चांगला निर्णय घेतला आहे असं सुधीर वाखुरे म्हणतात.

हेमंत म्हात्रे म्हणतात, खरंतर सगळ्याच गेम्सवर बंदी घालायला हवी, तरुण पिढीचं विशेषत: लहान मुलांचं गेम्समुळे खूप नुकसान होतं.

राहुल कांबळेंनी म्हटलंय की पोरं पब्जीवर फ्रस्ट्रेशन काढायची, यांनी जीडीपीचं फ्रस्ट्रेशन पब्जीवर काढलंय.

मनोज मोरे यांना हा निर्णय योग्य वाटत नाही. ते म्हणतात, मॅच हरल्यावर टीव्ही तोडणारे आणि चीनने सीमेवर हल्ला केला म्हणून अॅपवर बंदी घालणारं सरकार -कसलाच फरक दिसत नाही, दोघेही आततायी.

विकास पवार लिहितात की अॅप बंद करून लोकांची दिशाभूल करू नका. भारतीय लोकांच्या भावनांशी खेळू नका.

हे सरकार काल्पनिक घटनेवर आधारित नाही, यांचा लोकांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही असं नयन सोनटक्के म्हणतात.

मनोज भुवड म्हणतात जीडीपीवरचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे.

फोटो स्रोत, Pubg

तुळशीदास शेळके यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना म्हटलंय की खूप छान निर्णय, भारतीयांना अकार्यक्षम करणारा पब्जी हा खेळ होता.

कार्तिक गांगुर्डे म्हणतात, बंदी घालून काय फायदा-बंदी घातलेली अॅप्स अजून वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

विक्रम पाटेकर यांनी अनुप्रास साधला आहे. चीन आमच्या मॅपवर हल्ला करत आहेत, आम्ही त्यांच्या अॅपवर हल्ला करत आहोत.

कुणाल कुंभार म्हणतात की, आभार मानले पाहिजेत सरकारचे कारण त्या पब्जी गेममुळे आताची पिढी वाया चालली होती.

रोहिदास पिंगळे यांनीही सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. खूप बरं केलं पब्जीवर बंदी घालण्यात आली. कॉलनी, रुम्स, रस्त्यावर जिथे बघावं तिथे पोरं गेम खेळत होती. कॉल घेण्यासही तयार नसत. पण नुसता गेम बंद करून चालणार नाही. सरकारने आता खरे प्रश्नही सोडवायला हवेत.

पब्जीसाठी नवा महागडा फोन घेणाऱ्यांची अवस्था

और करो व्हीडिओ डिस्लाईक्स

ढिनच्यॅक ढिच्यॅक (भारतीय पालक)

अखेर तो दिवस उजाडला

मोर्चेबांधणी

सगळं मुसळ केरात गेलं राव

हमको फरक नही पडता

आता काय करावं

साला ये दु:ख काहे खत्म नही होता है बे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)