9 वाजता 9 मिनिटं सोशल मीडियावर का ट्रेंड होऊ लागला?

मोहीम

फोटो स्रोत, BBC/TWITTER

बेरोजगारीसंदर्भात देशाच्या विविध भागातून सूर उमटतो आहे. बुधवारी याच विषयाला धरून रात्री 9 वाजता 9 मिनिटं हा ट्रेंड चालवण्यात आला.

या मोहिमेला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. यानुसार आपापल्या घरी वीजपुरवठा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

सोशल मीडियावर, ट्वीटरवर 9 वाजता 9 मिनिटं ट्रेंड होऊ लागलं. देशातल्या असंख्य तरुणांनी तसंच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात ट्वीट करायला सुरुवात केली. यामुळे हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. कंगना राणावत प्रकरण बाजूला पडून सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला.

लोकांनी हातात मेणबत्ती घेतल्याचे फोटो शेअर केले. बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत या हॅशटॅगसह दहा लाखाहून अधिक ट्वीट करण्यात आले होते.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मेणबत्ती पेटवून तरुणांना पाठिंबा दिला.

फोटो स्रोत, TWITTER

बिहारमध्ये आरजेडीचे लालूप्रसाद यादव, तेजप्रताप यादव आणि राबडीदेवी यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवला.

बिहार बेरोजगारीचं केंद्रबिंदू झाला आहे अशी टीका तेजस्वी यांनी केली. सोशल मीडियावर लोक फोटो आणि पोस्टच्या बरोबरीने हा हॅशटॅग वापरताना दिसले.

फोटो स्रोत, TWITTER

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)