पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, प्रीतम मुंडे क्वारंटाईन

फोटो स्रोत, facebook
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत असल्याने त्या सध्या घरातच क्वारंटाईन झाल्या आहेत.
माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
फोटो स्रोत, facebook
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. बीडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मुंबईला परतल्यापासून त्यांना त्रास जाणवत आहे. पण त्यांची RTPCR कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण तरीही खबरदारी म्हणून त्या घरातच क्वारंटाईन झाल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर पोस्ट लिहून ही माहिती दिली.
फोटो स्रोत, EKNATH SHINDE/FACEBOOK
एकनाथ शिंदे
त्यांनी म्हटलं, "काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती."
फोटो स्रोत, Twitter
यापूर्वी राज्याचे महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोनाची लागण झाली.
बच्चू कडू यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटलंय, "माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी."
फोटो स्रोत, facebook
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
मुनगंटीवार यांनी फेसबुकवर माहिती दिली की, "माझी कोव्हिड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉलचे पालन करून स्वत:ची चाचणी करून घ्यावी ही विनंती."
फोटो स्रोत, facebook
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
18 सप्टेंबरला त्यांनी ट्वीट केलं की, "माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे."
फोटो स्रोत, Twitter
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीटरवरून सांगितले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनीही योग्य उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.
नितीन गडकरी यांनाही कोरोनाचा संसर्ग
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जल वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. "मला अशक्तपणा जाणवत होता. त्यासाठी मी तपासणीसाठी गेलो असता कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी आपल्याला कळले आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत," अशी माहिती गडकरींनी दिली.
काल तपासणीसाठी गेल्यावर कोरोनाची चाचणी झाली आणि मी स्वतःला आयसोलेट केले आहे असं गडकरींनी म्हटले आहे. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने मी सध्या बरा आहे असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून सेल्फ आयसोलेट करुन घ्यावे असे गडकरींनी म्हटले आहे.
याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
महाराष्ट्रात खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )