सेक्स टॉय हॅक झाल्याने हजारो पुरुषांचं लिंग कुलूपबंद

  • लिओ केलियन
  • टेक्नॉलॉजी डेस्क एडिटर
सेक्स टॉय

फोटो स्रोत, PEN TEST PARTNERS

फोटो कॅप्शन,

सेक्स टॉय

महिला किंवा पुरुषांच्या एकमेकांप्रति विश्वासाचा संबंध लैंगिक आयुष्याशी जोडण्याची पद्धत अनेक वर्षांपासून रूढ झाली आहे. सध्याच्या काळात जगात सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत असताना लैंगिक क्षेत्र कसं मागे राहील?

तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पुरुष जोडीदाराचं लैंगिक आयुष्य आपल्या मुठीत ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं उपकरण (सेक्स टॉय) तयार करण्यात आलं होतं.

पण, या सेक्स टॉयचा पासवर्ड हॅकर्सनी हॅक केल्यामुळे ते वापरणाऱ्या व्यक्तीचं लिंग चक्क त्या यंत्रातच अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. हे सेक्स टॉय चालवणारं अॅप 'क्वि' या चिनी कंपनीने बनवलं होतं.

सेलमेट लॉकर

सेलमेट असं या उपकरणाचं नाव आहे. जगभरात अनेक ई-कॉमर्स कंपन्या किंवा सुपर मार्केट स्टोअर्समध्ये ते विकत मिळतं.

सेलमेट चॅस्टिटी केज हे उपकरण ऑनलाईन 190 डॉलर्सना विकलं जातं. 'जोडीदाराचं लैंगिक आयुष्य आपल्या मुठीत' असं सांगत या उपकरणाचं मार्केटिंग करण्यात आलं आहे.

जवळपास 40 हजार जणांनी हे प्रोडक्ट विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे.

या उपकरणाच्या आतमध्ये पुरुषाचं लिंग ठेवून ते लॉक करता येऊ शकतं. सदर लॉक उघडण्यासाठी विशिष्ट पासवर्ड असतो. तसंच एका अॅपद्वारे इंटरनेट आणि ब्लूटूथच्या माध्यमातून ते ऑपरेट करता येऊ शकतं, अशी त्याची रचना आहे. लिंग आतून बाहेर काढता येऊ नये यासाठी सेलमेटमध्ये मोठ्या प्रमाणात धातूच्या पट्टी वापरण्यात आल्या आहेत.

फोटो स्रोत, PEN TEST PARTNERS

फोटो कॅप्शन,

हे उपकरण असं दिसतं

पण यातील माहिती साठवण्यासाठी कंपनीच्या सर्व्हरचा वापर करण्यात येतो. नेमकं हेच हेरून हॅकर्सनी घाव घातला. हॅकर्सनी सदर माहिती हॅक करून त्याचं प्रोग्रॅमिंग बदललं. त्यामुळे सेलमेट वापरणाऱ्या अनेक व्यक्तींचे लिंग या यंत्रातच अडकून पडलं.

मूळ पासवर्डच हॅक झाल्यामुळे आपलं लिंग बाहेर काढण्यासाठी लोकांना इतर कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. अखेर, कटरचा वापर करून किंवा हातोड्याने प्रहार करून हे यंत्र फोडावं लागलं असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तक्रारीनंतर अॅपमध्ये बदल

हे उपकरण चालवणारं अॅप 'क्वि' नामक चिनी कंपनीने बनवलं असून आता त्याची दुरूस्ती करण्यात आल्याचं त्यांनी कळवलं आहे.

शिवाय, उपकरण वापरणाऱ्या लोकांना त्यांनी नवे पासवर्डसुद्धा अॅपमधून कळवले असून उपकरणाची तोडफोड करून नये, त्या दरम्यान तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे, असं आवाहन कंपनीने केलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

'मला सेक्स सायबोर्ग व्हायचंय...'

युकेच्या बकिंगहॅममधील पेन टेस्ट पार्टनर्स (PTP) ही कंपनी सायबर क्षेत्रात कार्यरत आहे. अशा प्रकारच्या हॅकिंगची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा अनुभव या कंपनीला आहे.

या कंपनीत संशोधक म्हणून काम करणाऱ्या अॅलेक्स लोमस यांच्या मते, "हॅकर्स अगदी कोणत्याही उपकरणाचं हॅकिंग करू शकतात, त्यामुळे या घटनेतून उत्पादकांनी धडा घेणं आवश्यक आहे. या माध्यमातून वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीसुद्धा चोरीला जात असणे, या सगळ्यांचे वाईट परिणामसुद्धा पाहायला मिळू शकतात."

लोमस यांनीच क्वि कंपनीला या समस्येबाबत कळवलं होतं. त्यानंतर कंपनीने त्याची दखल घेऊन अॅपमध्ये काही प्रमाणात बदल करून ते अपडेट केलं.

फोटो स्रोत, PEN TEST PARTNERS

फोटो कॅप्शन,

जगभर हे उपकरण वापरलं जात आहे.

पण बऱ्याच लोकांकडे अजूनही जुनंच अॅप डाऊनलोड केलेलं आहे. त्यांना यापुढेही काही अडचणी येऊ शकतात, असं कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे सेलमेट वापरकर्त्यांनी तातडीने अॅप अपडेट करून घ्यावं, असं आवाहन कंपनीने केलं आहे.

टेकक्रंच डॉट कॉमने याबाबत क्वि कंपनीसोबत बातचीत केली होती. सदर समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुर असल्याचं कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

"हॅकिंगमुळे कोणत्याही वापरकर्त्याला गंभीर इजा झाल्याची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. पण फक्त एका व्यक्तीने हॅकिंगमुळे लिंग अडकून पडल्याने जखमी झाल्याबाबत ऑनलाईन रिव्ह्यू दिला आहे. ही जखम भरून येण्यास एक महिना लागल्याचंही त्याने रिव्ह्यूमध्ये लिहिलं आहे, त्याबाबत अधिक माहिती घेत आहोत," अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी टेकक्रंचला दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)